महाबीज राज्यात ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 03:02 PM2018-05-05T15:02:39+5:302018-05-05T15:02:39+5:30
महाराराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) मागील वर्षी हा कार्यक्रम यशस्वी राबविल्यानंतर यावर्षी सोयाबीन व भात बियाण्यांच्या निर्मितीसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोला : शेतकऱ्यांना शुद्ध बियाणे उपलब्ध होऊन दर्जेदार उत्पादनासाठी राज्यात ग्राम बीजोत्पादनावर भर दिला जात असून, महाराराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) मागील वर्षी हा कार्यक्रम यशस्वी राबविल्यानंतर यावर्षी सोयाबीन व भात बियाण्यांच्या निर्मितीसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता ६५ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच प्रस्ताव मंजूर होणार असल्याचे वृत्त आहे.
शेतकºयांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होत नसल्याने अनेक वेळा बियाणे न उगवण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसानही होत आहे. यातून शेतकºयांची सुटका होऊन दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्यासाठी महाबीजने मागील वर्षी रब्बी व उन्हाळी हंगामात भुईमूग, गहू व हरभरा पिकांचा राज्यातील १६ हजार ६०० गावांत ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविला. यात तीन लाख शेतकºयांनी सहभाग घेतला होता. त्यासाठी ३० कोटी रुपये अनुदान दिले आहे. हा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर यावर्षी धान व सोयाबीनमध्ये हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. यासाठी महाबीजने ६५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करू न केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे वृत्त आहे. मागील वर्षी दहा हजार ५५९ क्विंटल बियाणे शेतकºयांना अनुदानावर वाटप करण्यात आले होते. यावर्षी भात व सोयाबीन बियाण्यात वाढ करण्यात येणार आहे. यासाठी मिळणाºया अनुदानामध्ये केंद्र सरकारचा ६० टक्के, तर राज्य शासनाचा वाटा ४० टक्के आहे.
शुद्ध व दर्जेदार बियाणे उत्पादनासाठी राज्यात ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत असून, यावर्षी सोयाबीन व भात पिकाचा ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे.
- ओमप्रकाश देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला.