हरभरा बियाणे घोटाळा; १३६ कृषी केंद्र संचालकांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:54 PM2018-11-20T12:54:35+5:302018-11-20T12:56:26+5:30

अकोला: अनुदानित हरभरा बियाणे घोटाळाप्रकरणी सुनावणी झालेल्या कृषी सेवा केंद्र संचालकांच्या परवान्यावर कारवाईचे अधिकार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर १३६ केंद्रांवर दोषारोपपत्राचे पुरावे त्यांच्या कार्यालयात सादर करण्यात आले.

 Gram seed scam; 136 Agriculture Center owener on radar | हरभरा बियाणे घोटाळा; १३६ कृषी केंद्र संचालकांचा जीव टांगणीला

हरभरा बियाणे घोटाळा; १३६ कृषी केंद्र संचालकांचा जीव टांगणीला

googlenewsNext

- सदानंद सिरसाट
अकोला: अनुदानित हरभरा बियाणे घोटाळाप्रकरणी सुनावणी झालेल्या कृषी सेवा केंद्र संचालकांच्या परवान्यावर कारवाईचे अधिकार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर १३६ केंद्रांवर दोषारोपपत्राचे पुरावे त्यांच्या कार्यालयात सादर करण्यात आले. त्यावर कारवाईचा निर्णय घ्यावाच लागणार असल्याने कृषी केंद्र संचालकांचा जीव टांगणीला लागला आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून शासनाने २०१६ च्या रब्बी हंगामात हरभरा बियाणे अनुदानावर वाटपाची योजना राबविली. त्या योजनेचा फायदा अकोला जिल्ह्यातील शेतकºयांना नव्हे, तर अकोला शहरातील चार वितरकांसह ग्रामीण भागातील १३६ कृषी केंद्र संचालकांनीच घेतल्याचे चौकशीत पुढे आले. त्यांच्यावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून कारवाई तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, कृषी केंद्र संचालकांनी न्यायालयात धाव घेतली. विशेष म्हणजे, या बियाण्यांच्या अनुदानापोटी ९० लाख रुपये देयक आधीच रोखण्यात आले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेनंतर जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाºयांपुढे सुनावणी झालेल्या कृषी केंद्रांवर कारवाई सुरू करण्याचे संकेत आहेत. त्या १३६ केंद्रांमध्ये जिल्ह्याच्या विविध भागातील केंद्रांचा समावेश आहे.

तालुकानिहाय गावातील कृषी सेवा केंद्र
तेल्हारा:
जगदंबा कृषी सेवा केंद्र, चांडक, सुपर, गोपाल, सागर, बालाजी, मंगलमूर्ती, गणराया, सरिता, दधिमती, गणेश, पुष्कर अ‍ॅग्रो एजन्सीज, शेतकी वस्तू भांडार, श्री गजानन अ‍ॅग्रो सेंटर, साई अ‍ॅग्रो सेंटर, श्रद्धा, हनुमान-दानापूर, गुप्ता एजन्सीज, वृशाली, राठी, कृषी विकास अ‍ॅग्रो-हिवरखेड, अभिजित-पाथर्डी, अक्षय-बेलखेड, प्रगत शेतकरी कृषी केंद्र, अश्विनी अ‍ॅग्रो एजन्सीज-आडसूळ, जय गजानन-माळेगाव बाजार, विदर्भ-अडगाव.
अकोला शहर : शहा एजन्सीज, दीपक कृषी केंद्र, स्वाती सिड्स, अनुजा सिड्स, स्नेहसागर, स्वाती सिड्स, पाटणी ट्रेडर्स, प्रकाश ट्रेडिंग, गजानन सिड्स, योगेश, शिवराज, कृषी कल्पतरू अ‍ॅग्रो एजन्सीज, अमानकर, नयन, संजय, नॅचरली युवर्स, शेतकरी, कास्तकार, अभिजित अ‍ॅग्रो, साईविजय, ओम ट्रेडर्स, कृषी वैभव, कोरपे ब्रदर्स, अ‍ॅग्रो असोसिएटस, आशीर्वाद, अंकुश, राजस, मोरेश्वर, रोशन, अकोला जिल्हा खरेदी-विक्री सोसायटी.
अकोला ग्रामीण : उमेश अ‍ॅग्रो-दहिगाव गावंडे, जय गजानन, बालाजी अ‍ॅग्रो क्लिनिक-काटेपूर्णा, जय गजानन आपातापा, गजाननकृपा कानशिवणी, मेहरे, अंबिका-बोरगावमंजू, प्रणव-मोरगाव (भाकरे), लोकसंचालित-कापशी रोड.
मूर्तिजापूर : महेश अ‍ॅग्रो एजन्सीज, अ‍ॅग्रो व्हिजन, महालक्ष्मी, गजानन, गुरूकृपा, धनलक्ष्मी, शेतकरी, श्याम, शिव अ‍ॅग्रो, पाटील, राधास्वामी.
पातूर: साई ट्रेडर्स, तालुका खरेदी-विक्री, दीपा, धनलक्ष्मी, अमोल, गोस्वामी, चैतन्य, अमोल-विवरा, सस्ती, मळसूर, आलेगाव, खेट्री, चरणगाव.

अकोट : (युवराज अ‍ॅग्रो एजंसीज, आनंद, बालाजी अ‍ॅग्रो, वृशाली, सिद्धीविनायक, योगेश, श्रीराम, तालुका खविसं, अमृत, दामोदर कृषी, नर्मदा, शेतकरी, बी.एन.झुनझुनवाला, समर्थ, बालाजी कृषी केंद्र, एकता अ‍ॅग्रो, तुकडोजी महाराज-अकोट), वृशाली-पणज, (संकल्प, समर्थ, रेलेश्वर, अमोल सिडस्-चोहोट्टा बाजार), न्यू अरविंद-आसेगाव बाजार.
बाळापूर : स्वराज-गायगाव, (चितलांगे, संतकृपा-निंबा), (सचिन, संतकृपा, न्यू. माउली, जागेश्वर, श्रीराम अ‍ॅग्रो, आनंद, संतोष- वाडेगाव), शामली-उरळ, अंबिका-बाळापूर.
बार्शीटाकळी : (ओम, रेणुका, भावना, आनंद, तालुका खविसं, माउली- बार्शीटाकळी), (जिजाऊ, लक्ष्मी, महालक्ष्मी, व्यंकटेश-पिंजर), वैभव-कान्हेरी सरप.

 

Web Title:  Gram seed scam; 136 Agriculture Center owener on radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.