हरभरा, गव्हाचा पेरा वाढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:32 AM2020-12-13T04:32:42+5:302020-12-13T04:32:42+5:30

पावसामुळे साेयाबीनचा दर्जा घसरला ! मुंडगाव : सततच्या पावसामुळे मुंडगाव परिसरात सोयाबीनचा दर्जा घसरल्याने भाव मिळत नसल्याचे चित्र हिवरा ...

Gram, wheat sowing will increase! | हरभरा, गव्हाचा पेरा वाढणार !

हरभरा, गव्हाचा पेरा वाढणार !

Next

पावसामुळे साेयाबीनचा दर्जा घसरला !

मुंडगाव : सततच्या पावसामुळे मुंडगाव परिसरात सोयाबीनचा दर्जा घसरल्याने भाव मिळत नसल्याचे चित्र हिवरा आश्रम परिसरात आहे. उत्पादन घटल्याने लागवडीसाठी लागलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

पाणंद रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

चिखलगाव : परतीच्या पावसामुळे चिखलगाव परिसरातील पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना शेतमाल घरी आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे, पाणंद रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.

मायक्राे फायनान्सची वसुली थांबवा !

माना: मायक्राे फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे. लाॅकडाऊनमुळे अनेकांचे राेजगार गेले. तसेच व्यवसायही बुडाले आहे. त्यामुळे, मायक्राे फायनान्सकडून हाेणारी सक्तीची वसुली थांबविण्याची मागणी हाेत आहे.

शिकवणी वर्ग सुरू करण्याची मागणी

पातूर : लाॅकडाऊननंतर बंद करण्यात आलेले खासगी शिकवणी वर्ग ऑनलाइन सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे खासगी शिकवणी वर्ग संचालक आर्थिक संकटात सापडलेले आहेत. त्यामुळे, शिकवणी वर्ग सुरू करण्याची मागणी हाेत आहे.

फेरीवाल्यांना मदतीची प्रतीक्षा !

अकोट : केंद्र शासनाच्या वतीने फेरीवाल्यांसाठी आत्मनिर्भर भारत याेजनेंतर्गत दहा हजार रुपयांचे कर्ज देण्यात येते. शहरातील अनेक फेरीवाल्यांना अजूनही या याेजनेचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र आहे. याकडे नगरपालिकेले लक्ष देण्याची गरज आहे.

प्रवासी निवारे दुरुस्त करण्याची मागणी

चोहोट्टा बाजार : अकोट-अकोला मार्गावरील अनेक गावांमध्ये प्रवासी निवारे उभारण्यात आले हाेते. या प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना उन्हातच वाहनांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र परिसरात आहे. निवाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.

हमी दराने कापूस खरेदी करण्याची मागणी

हिवरखेड : परिसरात कापूस वेचणीस सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस येत आहे. दिवाळी काही दिवसांवर आल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्री करावी लागत आहे. व्यापारी कमी दराने कापूस खरेदी करीत असल्याचे चित्र हिवरखेड परिसरात आहे.

Web Title: Gram, wheat sowing will increase!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.