विधानसभा निवडणुकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार
By admin | Published: September 25, 2014 01:32 AM2014-09-25T01:32:49+5:302014-09-25T01:42:49+5:30
जनुनावासीयांनी केली पुढा-यांना गावबंदी.
साहेबराव राठोड / मंगरूळपीर (वाशिम)
आपलं स्वातंत्र्य सत्तरीच्या उंबरठय़ावर येऊन ठेपलंय. जागतिक महासत्तेची गोड स्वप्नही आम्हाला पडायला लागली; मात्र आपल्या देशाचा ह्यआत्माह्ण समजल्या जात असलेल्या खेड्यांची सद्यस्थिती पाहिली तर महासत्तेचा पाया किती पोकळ आहे, हे लक्षात यायला वेळ लागणार नाही. ह्यमरणयातना भोगणेह्ण कशाला म्हणतात, हे पहायचे असेल तर तालुक्यातील जनुना खुर्द गावाला नक्कीच भेट दय़ावी लागेल. ३५१ लोकसंख्या असलेले हे गाव संपुर्णत:आदिवासी आहे. सरकार आणि व्यवस्थेने वार्यावर सोडलेल्या जनुना खुर्द गावाला जाण्यासाठी काटेपूर्णा अभयारण्याच्या घनदाट जंगलातून रस्ता धुंडाळत तेथील नागरिक आपल्या जगण्याचा अर्थ शोधत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या गावाचा रस्त्यासाठी सरकार आणि व्यवस्थेशी जीवघेणा संघर्ष सुरू आहे. म्हणूनच येत्या विधानसभा निवडणुकीवर जनुना ग्रामवासीयांनी बहिष्कार टाकून पुढार्यांना गावबंदी केली आहे.
या गावाच्या रस्त्यासाठी मंजूर झालेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा २0 लाखांचा निधी सदर कामावर खर्च झाला नाही, असा आरोप ग्रामस्थांचा आहे.