ग्रामसेवकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 06:22 PM2019-08-13T18:22:10+5:302019-08-13T18:22:15+5:30

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन केले जात आहे.

Gramsevak agitation in front of Akola Zilla Parishad | ग्रामसेवकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

ग्रामसेवकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

Next

अकोला : राज्यातील २२००० ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांवर शासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन केले जात आहे. १३ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन, त्याबाबतचे निवेदन ग्रामसेवक युनियनच्या राज्य तसेच जिल्हा शाखा पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना दिले.
गावपातळीवर समकक्ष काम करणारे राज्य कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ग्रामसेवकांना प्रचंड काम असताना इतरांना सेवाविषयक बाबी कमी असताना वेतनात असमानता, पदोन्नती संधी नाही. शासनाने ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांचा विचार न केल्याने आंदोलन केले जात आहे. त्यामध्ये समान काम-समान दाम, समकक्ष पदे-समान वेतनश्रेणी, ग्रामसेवकाच्या शैक्षणिक अर्हता बदल करणे, लोकसंख्या आधारित ग्रामविकास अधिकारी पदांत वाढ करणे, वेतनत्रुटी दूर करणे, २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेंशन योजना लागू करणे, आदर्श ग्रामसेवकांना आगाऊ एक वेतनवाढ देणे, ग्रामसेवक युनियनचे महाअधिवेशन घेणे, अतिरिक्त कामे कमी करणे, या मागण्यांचा समावेश आहे. त्या मंजूर होण्यासाठी असहकार आंदोलन केले जात आहे. त्यानंतर आता १६ आॅगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन, १८ आॅगस्ट रोजी पालकमंत्री यांच्या घरासमोर आंदोलन, २४ आॅगस्ट रोजी ग्रामविकास मंत्री, प्रधान सचिव यांच्या निवासस्थानासमोर राज्याचे पदाधिकारी एक दिवस उपोषण करतील. २२ आॅगस्ट रोजी असहकार आंदोलन समाप्त करून काम बंद आंदोलन सुरू होणार आहे. त्यासाठी सर्वच ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या चाव्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांकडे देणार आहेत. याबाबतचा इशाराही निवेदनात देण्यात आला. यावेळी ग्रामसेवक युनियनचे विभागीय सहसचिव शेख चांद कुरेशी, डॉ. उल्हास मोकळकर, जिल्हाध्यक्ष रवीबाबू काटे, बाळासाहेब बोचरे, निमकर्डे, रोहिदास भोयर, संजय गावंडे, विनोद सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: Gramsevak agitation in front of Akola Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.