ग्रामसेवकाला लाच घेताना अटक
By admin | Published: July 6, 2017 01:03 AM2017-07-06T01:03:34+5:302017-07-06T01:03:34+5:30
दोन हजार रुपयांची केली होती मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास वेतन काढण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करणाऱ्या जनुना येथील लाचखोर ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ जुलै रोजी रंगेहात अटक केली. त्याच्याविरुद्ध पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना येथील ग्रामपंचायतच्या एका कर्मचाऱ्याचे चार महिन्यांचे वेतन, १० महिन्यांचे घरभाडे भत्ता, असे एकूण २९ हजार ८०० रुपयांचा धनादेश तयार करण्यात आला होता. या धनादेवर स्वाक्षरी करण्यासाठी ग्रामसेवक सुरेश भागवत फुलाने याने दोन हजार रुपयांची मागणी केली होती.
संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविषयी तक्रार केली होती.
या तक्रारीवरून बुधवारी सापळा रचून फुलाने यास ग्रामपंचायत कार्यालयात पैसे घेताना रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.