ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन, कामकाज ठप्प
By admin | Published: July 6, 2014 07:49 PM2014-07-06T19:49:31+5:302014-07-06T19:49:31+5:30
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्यांच्या शासनाकडे प्रलंबित विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.
अकोला : ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्यांच्या शासनाकडे प्रलंबित विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायतींमधील २६५ ग्रामसेवक संपावर गेले आहे. त्यामुळे गावांमधील सर्व कामकाज ठप्प झाले आहेत.
सध्या खरीप हंगाम सुरू झाला असल्यामुळे ग्रामसेवकांनी गावात राहणे गरजेचे आहे. शेतकर्यांना ग्रामसेवकांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. ग्रामविकास अधिकार्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, मग्रारोहयोकरिता स्वतंत्र यंत्रणा उभारावी, १0 ग्रामपंचायतींमागे एक विस्तार अधिकारी नेमण्यात यावा, प्रवास भत्ता तीन हजार रुपये करण्यात यावा, कंत्राटी ग्रामसेवकांना नियमित करण्यात यावे, विनाचौकशी निलंबन थांबवावे, मग्रारोहयोच्या कामांची एकतर्फी चौकशी व वसुली बंद करावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांपैकी कंत्राटी ग्रामसेवक वगळता अन्य ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतींच्या चाव्या व शिक्के गटविकास अधिकार्यांना सुपूर्द केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे. शुक्रवारपर्यंंत शासनाच्या वतीने संपाची दखल घेण्यात आली नसल्याने संप सुरूच अशी भूमिका ग्रामसेवक संघटनेने घेतली आहे.