चार हजाराची लाच घेणारा लाचखोर ग्रामसेवक एसीबीचया जाळ्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 08:33 PM2017-11-21T20:33:54+5:302017-11-21T20:59:50+5:30

घरकुलाचा लाभ देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घे ताना सिरसोली येथील ग्रामसेवक अशोक नागराज घोपे यास एसीबीच्या पथकाने  २१ नोव्हेंबर रोजी रंगेहात अटक केली. 

A gramsevek who bribe four thousand rupees, caught anti corruption bureau! | चार हजाराची लाच घेणारा लाचखोर ग्रामसेवक एसीबीचया जाळ्यात!

चार हजाराची लाच घेणारा लाचखोर ग्रामसेवक एसीबीचया जाळ्यात!

Next
ठळक मुद्देघरकुलाचा लाभ देण्यासाठी मागितली लाचलाचखोर ग्रामसेवक सिरसोली येथील अशोक नागराज घोपे 

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरसोली (अकोला) : घरकुलाचा लाभ देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घे ताना सिरसोली येथील ग्रामसेवक अशोक नागराज घोपे यास एसीबीच्या पथकाने  २१ नोव्हेंबर रोजी रंगेहात अटक केली. 
दोन घरकुले मंजूर करण्यासाठी सिरसोली येथील फिर्यादीस सिरसोली, घोडेगाव,  अटकळी येथील ग्रामसेवक अशोक घोपे याने १0 हजार रुपयांची लाच मागितली.  तडजोडीनंतर ही आठ हजार रुपये देण्याचे ठरले. फिर्यादीस लाच द्यायची नसल्याने  त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांच्याकडे तक्रार केली. या  तक्रारीवर एसीबीने २१ नोव्हेंबर रोजी सापळा रचून ग्रामसेवक घोपे यास तेल्हारा ये थील घराजवळ चार रुपये घेताना रंगेहात अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात पोलीस  निरीक्षक ईश्‍वर चव्हाण यांच्या पथकाने केली. ग्रामसेवकास अटक करण्यात आली  असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ईश्‍वर चव्हाण करीत आहेत.  

Web Title: A gramsevek who bribe four thousand rupees, caught anti corruption bureau!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.