पंढरपूरची यात्रा रद्द केल्याने महाआघाडी सरकारचा निषेध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:42+5:302021-07-18T04:14:42+5:30
अकोट : पंढरपूरची यात्रा रद्द तसेच ज्येष्ठ कीर्तनकार हभप बंडातात्या कराडकर यांना केलेल्या अटकेचा निषेध करीत अकोट येथे बजरंग ...
अकोट : पंढरपूरची यात्रा रद्द तसेच ज्येष्ठ कीर्तनकार हभप बंडातात्या कराडकर यांना केलेल्या अटकेचा निषेध करीत अकोट येथे बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तहसीलदार नीलेश मडके यांना निवेदन देऊन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार, प्रशासनाने जागोजागी अडवणूक केलेल्या सर्व वारकऱ्यांना सन्मानपूर्वक मुक्त करावे, त्यांच्यावर लावलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, आषाढी एकादशीपासून विविध भागांत मठामध्ये चालणारे चतुर्मास सेवा व मंदिरातील पारंपरिक उत्सव यावरील प्रतिबंद दूर करावेत तसेच मुख्यमंत्र्यांनी सरकारी पूजेसाठी पंढरपूर येथे येऊ नये आदी मागण्या बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी हभप पवन महाराज ताडे, अनिल आप्पा गोंडागरे, राजेश चंदन, गजानन माकोडे, गोपाळ कठाळे, शिवा टेमझरे, सागर अस्वार, प्रवीण जीवराजाने, ज्ञानेश्वर दुधे, राधेश्याम बोडखे, विशाल गायकी, वामन जकाते, सारंग कराळे, ॲड. रवीश कुळकर्णी, नीलेश नवघरे, शंकर बुंदले, सावन चांडक, संजय ताडे यांची उपस्थिती होती.
...अन्यथा रस्त्यावर उतरणार!
या आंदोलनानंतरही साधूसंतांची, वारकऱ्यांची अवहेलना होत आहे. अवहेलना न थांबल्यास येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.