बोरगावात भव्य कावड यात्रा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 07:56 PM2017-07-31T19:56:18+5:302017-07-31T20:00:40+5:30

बोरगाव मंजू: श्रावणाच्या दुसºया सोमवारी बोरगाव मंजू येथे श्री राजराजेश्वर शिव भक्तांनी १०१ भरण्यांची कावड यात्रा काढली. रविवारी येथील भाविकांनी काटेपूर्णा नदीचे पाणी आणून महादेवाला जलाभिषेक केला.

Grand kavad yatra festival in borgaon | बोरगावात भव्य कावड यात्रा महोत्सव

बोरगावात भव्य कावड यात्रा महोत्सव

Next
ठळक मुद्देश्री राजराजेश्वर शिवभक्तांचा उपक्रमशिव भक्तांनी काढली १०१ भरण्यांची कावड यात्राकाटेपूर्णा नदीचे पाणी आणून केला महादेवाला जलाभिषेक

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू: श्रावणाच्या दुसºया सोमवारी बोरगाव मंजू येथे श्री राजराजेश्वर शिव भक्तांनी १०१ भरण्यांची कावड यात्रा काढली. रविवारी येथील भाविकांनी काटेपूर्णा नदीचे पाणी आणून महादेवाला जलाभिषेक केला.
सोमवारी सकाळीच कावड यात्रा शहरात ढोल भजनाच्या तालात दाखल झाली. या कावड यात्रेत शहरातील हजारो शिवभक्त सामील होऊन शिवनामाचा जयघोष केला. त्यामुळे, शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. दरम्यान, पालखी कावडमध्ये शंकर-पार्वती, महादेव पिंड, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा असा उत्कृष्ट देखावा केला होता. शहरात पालखी दाखल होऊन मुख्य मार्गावरून पवित्र तीर्थाने देव-देवतांचा जलाभिषेक करण्यात आला. या पालखी सोहळा मिरवणुकीमध्ये शिवभक्त, लहान थोर, अबालवृद्धांसह सर्वच धर्माचे लोक सहभागी झाले होते. तर शहरात ठिकठिकाणी आपल्या घराजवळ पालखीचे महिलांनी पूजा अर्चा केली.


शहरात पालखी पोहचताच विविध सामाजिक संघटनांनी स्वागत केले. ग्रामपंचायत कार्यालय, तसेच बोरगाव मंजू दारूबंदी संघर्ष समितीच्या वतीने चहा व अल्पोपाहार शिवभक्तांना वितरित करण्यात आला. यावेळी शांतता समिती, गाव दारूबंदी संघर्ष समिती, ग्रामपंचायत कार्यालय सर्व पदाधिकारी शिवभक्त विविध संघटना यांनी सहयोग दिला. तर शांतता व सुव्यवस्थेकरिता पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.

Web Title: Grand kavad yatra festival in borgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.