कायम विनाअनुदानित खासगी उच्च माध्यमिक शाळांना अनुदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 03:29 PM2018-09-16T15:29:33+5:302018-09-16T15:29:45+5:30
अकोला: कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी दिलेल्या खासगी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग तुकड्यांना शासनाने अनुदान मंजूर केले आहे.
अकोला: कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी दिलेल्या खासगी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग तुकड्यांना शासनाने अनुदान मंजूर केले आहे. जिल्ह्यातील १0 उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर झाले असून, त्यासाठी शासनाने शिक्षण विभागामार्फत अतिरिक्त तुकड्या, सध्याची शाळानिहाय पटसंख्या, कार्यरत शिक्षकांची माहिती मागविली आहे.
शासनाने जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित खासगी उच्च माध्यमिक शाळांपैकी गाडगेबाबा विद्यालय, दहीगाव गावंडे, डवले उच्च माध्यमिक विद्यालय मोठी उमरी, अमरीन उर्दू विद्यालय शिलोडा, हाजी मोहम्मद जाफर सिद्दिकी विद्यालय अकोली खदान, इकरा उर्दू उच्च माध्यमिक विद्यालय, अकोट, हुस्सामिया उर्दू विद्यालय, बाळापूर, जावेद खान उर्दू विद्यालय महान, मनोहर नाईक विद्यालय महान, संत तुकाराम महाराज विद्यालय किनखेड पूर्णा, सुमनताई वानखडे विद्यालय, भंडारज आदी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील अतिरिक्त तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करण्यात आले आहे. या शाळांनी त्यांची माहिती शिक्षण विभागाला सादर करावी लागणार आहे. १७ सप्टेंबरपर्यंत प्राचार्य, मुख्याध्यापकांनी संदर्भीय पत्रानुसार उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील अतिरिक्त तुकड्यामधील सध्याची शाळानिहाय विद्यार्थी पटसंख्या व कार्यरत शिक्षकांची माहिती, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २0 टक्केप्रमाणे प्रतिमहिना लागणारा महिन्याचा तपशील आणि २0१३-१४, २0१५-१६, २0१६-१७ व २0१७-१८ ची संचमान्यता सादर करण्यास शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)