२३ हजार शेतक-यांना अनुदान!
By admin | Published: March 15, 2017 02:48 AM2017-03-15T02:48:26+5:302017-03-15T02:48:26+5:30
पणन संचालकांकडे आठ कोटींची मागणी; सोयाबीन उत्पादक शेतकर्यांच्या याद्यांची छाननी
संतोष येलकर
अकोला, दि. १४- सोयाबीन विकलेल्या जिल्हय़ातील २२ हजार ९८२ शेतकर्यांना प्रति क्विंटल २00 रुपयेप्रमाणे लवकरच अनुदान मिळणार आहे. त्यासाठी जिल्हय़ातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून प्राप्त सोयाबीन विकलेल्या शेतकर्यांच्या याद्यांची छाननी करण्यात येत असून, पात्र सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना अनुदान वाटपासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत ७ कोटी ७0 लाख ९४ हजार रुपयांच्या अनुदानाची मागणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत मंगळवारी राज्याच्या पणन संचालकांकडे करण्यात आली आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना आधार देण्यासाठी सोयाबीन विकलेल्या शेतकर्यांना प्रतिक्विंटल २00 रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत गत २0 जानेवारी रोजी घेण्यात आला. त्यानुषंगाने सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना प्रतिक्विंटल २00 रुपये अनुदान वाटप करण्यासाठी जिल्हय़ातील सोयाबीन विकलेल्या शेतकर्यांच्या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत जिल्हय़ातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून मागविण्यात आल्या होत्या. जिल्हय़ातील सातही कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून प्राप्त झालेल्या सोयाबीन विकलेल्या शेतकर्यांच्या याद्यांची तालुकास्तरीय समित्यांकडून तपासणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हय़ात सोयाबीन विकलेल्या २२ हजार ९८२ शेतकर्यांना अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
तालुकास्तरीय समित्यांकडून पात्र ठरविण्यात आलेल्या शेतकर्यांच्या याद्यांची छाननी जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत करण्यात येत असून, अनुदानासाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील सोयाबीन विकलेल्या शेतकर्यांना अनुदान वाटप करण्यासाठी ७ कोटी ७0 लाख ९४ हजार १४८ रुपयांच्या अनुदानाची मागणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत राज्याच्या पणन संचालकांकडे करण्यात आली आहे. याद्यांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हय़ातील सोयाबीन विकलेल्या शेतकर्यांसाठी लवकरच अनुदान प्राप्त होणार आहे.
जिल्हय़ातील सोयाबीन विकलेल्या शेतकर्यांना अनुदान वाटपासाठी तालुकास्तरीय समित्यांकडून प्राप्त झालेल्या पात्र शेतकर्यांच्या याद्यांची छाननी करण्याचे काम सुरू आहे. छाननीनंतर अनुदानासाठी पात्र शेतकर्यांच्या याद्या ह्यऑनलाइनह्ण पणन संचालकांकडे सादर करण्यात येतील. त्यानंतर सोयाबीन अनुदानाची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
- जी.जी. मावळे
जिल्हा उपनिबंधक
शेतकर्यांनी विकले ३ लाख ८५ हजार क्विंटल सोयाबीन!
जिल्हय़ातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बाश्रीटाकळी व मूर्तिजापूर या सातही कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून प्राप्त अहवालानुसार सातही बाजार समित्यांतर्गत २२ हजार ९८२ शेतकर्यांनी ३ लाख ८५ हजार ४७0 क्विंटल बियाणे विकले.