रब्बी हंगामातील बियाण्यांवर राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:42 PM2018-10-03T12:42:28+5:302018-10-03T12:43:25+5:30
अकोला : येत्या खरीप हंगामासाठी महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने गहू, हरभरा बियाण्यांचे नियोजन केले असून, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व ग्राम बीजोत्पादन योजनेंतर्गत राज्यातील शेतकºयांना भरीव अनुदान दिले जाणार आहे.
अकोला : येत्या खरीप हंगामासाठी महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने गहू, हरभरा बियाण्यांचे नियोजन केले असून, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व ग्राम बीजोत्पादन योजनेंतर्गत राज्यातील शेतकºयांना भरीव अनुदान दिले जाणार आहे.
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने अन्न सुरक्षा व ग्राम बीजोत्पादन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रब्बी हंगामातील चार प्रमुख पिकांसाठी ६० व ४० टक्के या प्रमाणात नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामात यावर्षी हरभरा हे प्रमुख पीक राहणार असून, महाबीजने यावर्षी २.३१ लाख क्ंिवटल बियाणे विक्रीस उपलब्ध केले आहे. यातील १.१५ लाख क्ंिवटल बियाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत उपलब्ध आहे. या अंतर्गत शेतकºयांना पाच गोण्यांच्या मर्यादेनुसार प्रतिक्ंिवटल २,५०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. ग्राम बीजोत्पादन योजनेंतर्गत एक एकर क्षेत्राच्या मर्यादेपर्यंत तीन हजार रुपये प्रतिक्ंिवटल अनुदान दिले जाणार आहे.
गहू बियाण्यांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजना सोलापूर, बीड व नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, त्यासाठीचे अनुदानाचे दर हे १० वर्षाच्या आतील अनुसूचित वाणास किमतीच्या ५० टक्के अनुदान उपलब्ध राहील, तर वर्षावरील वाणास प्रतिक्ंिवटल एक हजार रुपये अनुदान उपलब्ध आहे. तर ग्राम बीजोत्पादन योजनेंतर्गत गहू पिकाच्या सर्व वाणांसाठी प्रतिक्ंिवटल १,६०० रुपये अनुदान उपलब्ध आहे. रब्बी ज्वारीसाठी १० वर्षाआतील वाणासाठी प्रतिक्ंिवटल तीन हजार रुपये तर १० वर्षाच्यावरील वाणासाठी १,५०० रुपये अनुदान असणार आहे. करडई या पिकासाठीसुद्धा १० वर्षाआतील वाणांसाठी प्रतिक्ंिवटल ३,८५० रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.
गहू, हरभरा, ज्वारी व करडई रब्बी हंगामातील या प्रमुख पिकांसाठी भरीव अनुदान उपलब्ध करण्यात आले असून, राज्यातील शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील नजिकच्या कृषी विभाग कार्यालय, जिल्हा व्यवस्थापक महाबीज, अधिकृत विक्रेते व उपविके्रत्यांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.
रामचंद्र नाके, महाव्यवस्थापक (विपणन), महाबीज, अकोला.