रुग्णसंख्यावाढीचा आलेख काहीसा घसरला, मृत्यूचा आकडा कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:19 AM2021-04-04T04:19:13+5:302021-04-04T04:19:13+5:30

मार्च महिन्यात तीनशे ते चारशेवर राहणारा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एप्रिलच्या सुरुवातीपासून घसरला आहे. दररोज आरटीपीसीआर आणि रॅपिड मिळून २५०० ...

The graph of patient growth has come down a bit, the death toll has remained the same! | रुग्णसंख्यावाढीचा आलेख काहीसा घसरला, मृत्यूचा आकडा कायम!

रुग्णसंख्यावाढीचा आलेख काहीसा घसरला, मृत्यूचा आकडा कायम!

Next

मार्च महिन्यात तीनशे ते चारशेवर राहणारा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एप्रिलच्या सुरुवातीपासून घसरला आहे. दररोज आरटीपीसीआर आणि रॅपिड मिळून २५०० च्या वर चाचण्या होत आहेत. मात्र रुग्णांचा आकडा प्रतिदिन ३२० च्या आत दिसत आहे. असे असले तरी मृत्यूचा आकडा मात्र वाढत असल्याने चिंता वाढत आहे. तीन दिवसात तब्बल १५ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोविड बळींचा आकडा झपाट्याने वाढत आहे.

गत तीन दिवसातील आलेख

दिवस -प्राप्त अहवाल - रुग्ण - डिस्चार्ज - मृत्यू

१ एप्रिल - २९४४ - २५८ - ६९८ - ०५

२ एप्रिल - ३९३३ - ३१७ - ६२८ - ०४

३ एप्रिल - २६२४ - २९० - ५९३ - ०६

तीन दिवसांत १५ जणांचा मृत्यू जिल्ह्यात कोविडचा शिरकाव झाल्यापासून नव्या वर्षातील मार्च महिना आतापर्यंतचा सर्वाधिक घातक ठरला आहे. मार्च महिन्यात तब्बल ८६ रुग्णांना जीव गमवावा लागला. मृत्यूचे हे सत्र एप्रिल महिन्यातही सुरूच असून महिन्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांतच १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृतकांचा वाढता आकडा हा चिंताजनक आहे.

- एकूण - ९५०१ - ८६५ - १९१९ - १५

Web Title: The graph of patient growth has come down a bit, the death toll has remained the same!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.