पावसाने पळविला शेतक-यांच्या तोंडचा घास!

By admin | Published: October 3, 2016 02:42 AM2016-10-03T02:42:46+5:302016-10-03T02:42:46+5:30

कपशीला पातेगळ, सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान; शेतकरी हवालदिल.

Grass in front of the rain fed farmers! | पावसाने पळविला शेतक-यांच्या तोंडचा घास!

पावसाने पळविला शेतक-यांच्या तोंडचा घास!

Next

अकोला, दि. 0२- बरसणार्‍या परतीच्या जोरदार पावसाने जिल्हय़ात सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. गत दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यावर्षी सोयाबीनचे पीक चांगले आहे पण परतीचा पाऊस उसंत देत नसल्याने कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने, हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. तसेच कापसाची पातेगळ होत असल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
गत दोन वर्षांंत दुष्काळी परिस्थितीत जिल्हय़ातील शेतकरी संकटात सापडला. यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीनचे पीक चांगले होणार असल्याची आशा शेतकर्‍यांनी बाळगली; मात्र गत पाच-सहा दिवसांपासून परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. त्यामध्ये शनिवारी जिल्हय़ात जोरदार परतीचा पाऊस बरसला.
जिल्हय़ातील विविध भागांत सोयाबीनचे पीक कापणीला आले आहे. काही ठिकाणी कापणी झालेल्या सोयाबीनच्या गंजा शेतात लावण्यात आल्या आहेत. बरसणार्‍या पर तीच्या पावसात कापणीला आलेल्या सोयाबीनच्या शेंगा गळून पडल्या असून, कापणी झालेल्या सोयाबीनच्या गंजा पावसात भिजल्या आहेत.
पाऊस सुरू असल्याने कापणी झालेले सोयाबीन तयार करण्यासाठी हार्वेस्टर शेतापर्यंंत जाऊ शकत नाही. त्यामुळे काही ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले आहेत. कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीनचे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविल्याने दोन वर्षांच्या दुष्काळानंतर जिल्हय़ातील सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.

Web Title: Grass in front of the rain fed farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.