ग्रासरूट इनोव्हेटर : हळद पावडर निर्मितीमध्ये कंद सफाई यंत्र ठरतेय फायदेशीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:18 PM2018-12-21T12:18:49+5:302018-12-21T12:19:18+5:30

ग्रासरूट इनोव्हेटर : कंदापासून हळद पावडर बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये  कंदाची सफाई ही प्राथमिक प्रक्रिया आहे. 

Grassroot Innovator: A tuber cleaning device is beneficial in the production of turmeric powder | ग्रासरूट इनोव्हेटर : हळद पावडर निर्मितीमध्ये कंद सफाई यंत्र ठरतेय फायदेशीर 

ग्रासरूट इनोव्हेटर : हळद पावडर निर्मितीमध्ये कंद सफाई यंत्र ठरतेय फायदेशीर 

Next

- राजरत्न सिरसाट (अकोला)

राज्यात हळदीचे क्षेत्र वाढत आहे; पण हळद काढणे, प्रक्रिया करताना अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. यावर उपाय म्हणूनच विविध यंत्रांसह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाने हळद सफाई यंत्र विकसित केले आहे. कंदापासून हळद पावडर बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये  कंदाची सफाई ही प्राथमिक प्रक्रिया आहे. 

महाराष्ट्रात सद्यपरिस्थितीत हळद लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. हळद लागवडीचा  शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना हळद लागवड करूनच थांबावे लागत नाही, तर त्यावर प्रक्रिया करून हळकुंड तयार करावे लागते. ज्यावेळी जमीन उकरून हळकंद काढले जातात. त्यावेळी ते मातीने भरलेले असतात. या हळकंदांना साफ केल्याशिवाया त्यावर प्रक्रिया शक्य होत नाही. हळकंद साफ करताना, शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञानकापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाचे डॉ. प्रदीप बोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हळद सफाई यंत्र विकसित केले आहे. 

एक अश्वशक्तीवर चालणारे हे यंत्र असून, या यंत्रामध्ये नायलॉन तसेच पाण्याच्या फवाऱ्याचा वापर करू न माती लागलेल्या  हळदीची सफाई करता येते. यंत्रातील ब्रशने माती वेगळी होते, तसेच पाण्यासोबत वाहून वाहत असल्याने हळद साफ होते. विकसित केलेले हळद सफाई यंत्र अविरत पद्धतीचे असून, यंत्राद्वारे सफाई करण्याची क्षमता प्रतितास २.५ क्विंटल इतकी आहे. या यंत्राची कार्यक्षमता ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. शेतकरी, सहकारी यंत्रणा तसेच मोठ्या उद्योजकांसाठी हे यंत्र उपयोगी आहे.
 

Web Title: Grassroot Innovator: A tuber cleaning device is beneficial in the production of turmeric powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.