अनुदानावरील हरभरा बियाणे वाटपात शेतकऱ्यांची थट्टा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:58 PM2018-10-15T12:58:06+5:302018-10-15T12:58:18+5:30
अकोला : अनुदानावरील बियाणे वाटप योजनेंतर्गत रब्बी हंगामातील हरभरा पेरणीसाठी जिल्ह्यातील शेतकºयांना केवळ २० किलो हरभरा बियाण्याची एक बॅग वाटप करण्यात येत आहे.
- संतोष येलकर
अकोला : अनुदानावरील बियाणे वाटप योजनेंतर्गत रब्बी हंगामातील हरभरा पेरणीसाठी जिल्ह्यातील शेतकºयांना केवळ २० किलो हरभरा बियाण्याची एक बॅग वाटप करण्यात येत आहे. २० किलो बियाण्यात एक एकरही पेरणी होत नसल्याने, अनुदानावर मिळणारे अपुरे हरभरा बियाणे शेतकºयांची थट्टा करणारे ठरत आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या अनुदानावरील बियाणे वाटप योजनेत रब्बी हंगामातील हरभरा पेरणीसाठी जिल्ह्यातील शेतकºयांना ‘महाबीज’चे बियाणे वाटप करण्यात येत आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून ‘परमिट’ घेतलेल्या शेतकºयांना संबंधित कृषी सेवा केंद्रांमार्फत ८४० रुपयांमध्ये २० किलो हरभरा बियाण्याची एक बॅग वाटप करण्यात येत आहे. हरभरा पेरणीसाठी एकरी ३५ ते ४० किलो बियाणे लागते; परंतु अनुदानावरील हरभरा बियाणे वाटपात शेतकºयांना सरसकट केवळ २० किलो हरभरा बियाण्याची एक बॅग दिली जात आहे. अनुदानावर मिळणाºया या २० किलो हरभरा बियाण्यात एक एकरही पेरणी होत नाही. त्यामुळे अनुदानावर मिळणारे अपुरे हरभरा बियाणे शेतकºयांची थट्टा करणारे ठरत आहे.
जादा दराने बियाणे घेण्याची शेतकऱ्यांवर वेळ!
अनुदानावर मिळणाºया २० किलो हरभरा बियाण्यात एकरभरही पेरणी होत नाही. त्यामुळे पेरणीसाठी बाजारात जादा दराने हरभरा बियाणे विकत घेण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
हरभरा बियाण्याचे असे आहेत दर!
अनुदानावर बियाणे वाटप योजनेंतर्गत प्रतिकिलो ४२ रुपयेप्रमाणे शेतकºयांना हरभरा बियाणे वाटप करण्यात येत आहे, तर बाजारात प्रतिकिलो ७० ते ७५ रुपयेप्रमाणे हरभरा बियाण्याचे दर आहेत.
शासनाच्या योजनेंतर्गत बीजोत्पादनासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना प्रत्येकी २० किलो हरभरा बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी कृषी विभागामार्फत परमिट वाटप करण्यात येत आहे.
-राजेंद्र निकम,
जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी.
अनुदानावर मिळणाºया २० किलो हरभरा बियाण्याच्या एका बॅगमध्ये एक एकरही पेरणी होत नाही. त्यामुळे अनुदानावर मिळणारे हरभरा बियाणे ही शेतकºयांची थट्टा आहे. किमान पाच एकर पेरणीसाठी पुरेल एवढे हरभरा बियाणे शेतकºयांना अनुदानावर मिळाले पाहिजे.
-शिवाजीराव भरणे,
शेतकरी, रामगाव ता. अकोला.