महान धरण १00 टक्केच्या उंबरठय़ावर!
By admin | Published: October 3, 2016 02:37 AM2016-10-03T02:37:04+5:302016-10-03T02:37:04+5:30
काटेपुर्णा (महान) धरणाची पाणी पातळी ९८.४0 टक्क्यावर पोहचल्याने पाणी सोडण्याचे संकेत दिले आहेत.
महान (जि. अकोला), दि. २- संपूर्ण अकोला शहरासह महानवासीयांचे लक्ष लागलेल्या महान धरणाची पाणी पातळी १00 टक्क्यापर्यंंत पोहोचत असल्याने, अकोला शहरासह नदीकाठावरील ८४ खेडीगावासाठी ही आनंदाची बाब आहे. १ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या पावसामुळे तसेच २ ऑक्टोबरला सकाळी १0 वाजता झालेल्या मुसळधार पावसाने महान धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढून, १00 टक्कय़ाच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचले आहे.
मागील महिन्यात पावसाने चांगलीच दडी मारल्याने ३0 ऑगस्टपासून महान धरणाच्या जलसाठय़ात वाढ होणे पूर्णपणे ठप्प झाले होते. यातून अकोला शहराला पाणीपुरवठा होत असल्याने दररोज १ से. मी. पाणी पातळी कमी होत होती. त्यावेळी धरणाची पाणी पातळी ८७ टक्कय़ाच्यावर थांबली होती. परंतु मागच्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने महान धरणाच्या जलसाठय़ात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली. रविवार, २ ऑक्टोबर रोजी सकाळी १0 वाजता मुसळधार पाऊस झाल्याने महान धरणाच्या जलसाठय़ात दुपारी १२ वाजेपासून १0-१0 पॉइंटने झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली.
दुपारी १२ वाजताची वाढ बघता असे वाटत होते, की धरणाची पाणी पातळी दुपारी ३ वाजेपर्यंंत १00 टक्के होऊन गेट उघडावे लागणार; परंतु दुपारी ३ वाजतापासून पाणी पा तळी स्थिर झाल्याने गेट उघडण्याची वेळ आली नाही. २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता महान धरणात ११४0.७0 फूट, ३४७.६९ मीटर, ८४.९६९ द.ल.घ.मी. व ९८.४0 टक्के जलसाठय़ाची नोंद करण्यात आली आहे. मालेगाव, काटाकोंडाळा, अमनवाडी, जऊळका परिसरात एकाच वेळी दमदार पाऊस झाल्यास महान धरणाची पा तळी १00 टक्कय़ांपर्यंंत पोहचून, गेट उघडून त्यामधील शिल्लक पाण्याचा विसर्ग होणार, हे विशेष. धरणातील वाढत्या जलसाठय़ाकडे शाखा अभियंता ए. ए. सय्यद, एस. व्ही. जानोरकार, मनोज पाठक, शंकर खरात, शेषराव लुले, रमेश हातोलकर, नाना शिराळे, अकबर शहा यांच्यासह अन्य कर्मचारी लक्ष ठेवून नियोजन करीत आहेत.