महान धरणाचा जलसाठा ५८.६३ टक्क्यांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:13 AM2021-07-24T04:13:39+5:302021-07-24T04:13:39+5:30
महान : अकोला शहरासह ६४ खेडेगावांना पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणाचा जलसाठा ५८.६३ टक्क्यांवर पोहोचला आहे. गुरुवारी रात्री ...
महान : अकोला शहरासह ६४ खेडेगावांना पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणाचा जलसाठा ५८.६३ टक्क्यांवर पोहोचला आहे. गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने शुक्रवार, २३ जुलै रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत ११३१.९० फूट, ३४५ मीटर, ५०.६३० द.ल.घ.मी व ५८.६३ टक्के साठा उपलब्ध होता. महान पाटबंधारे विभागात एकूण ३१५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
महान येथील धरणात पाचव्यांदा पाच फूट पाणी वाढले असून, एकूण ३८ दिवसांत महान धरणाच्या जलसाठ्यात अकरा फुटांनी वाढ झाली आहे. धरणात एकूण पाच व्हॉल्व्ह बसविलेले असून, त्यापैकी चार व्हॉल्व्ह पाण्यात बुडाले आहे. पाचवा व्हॉल्व्ह पाण्यापासून केवळ दोन फूट दूर आहे.
-------------------
जलसाठा वाढणार!
मालेगाव परिसरातील काटा, कोंडाळा, जवुळका, धानोरा, अमनवाडी-मुसळवाडी, फेट्रा या भागात दमदार पाऊस होत असून, जलसाठ्याची १०० टक्क्यांकडे वाटचाल सुरू आहे. वाढलेल्या जलसाठ्याकडे सहायक कार्यकारी अभियंता नीलेश घारे, मनोज पाठक हे लक्ष ठेवून आहेत.
----------------
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार दोन-तीन दिवसांत अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे महान-काटेपूर्णा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
----------------------------
म्हातोडी परिसरात धुवाधार पाऊस
म्हातोडी : परिसरात शुक्रवारी धुवाधार पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिके पाण्याखाली गेली होती. परिसरातील घुसर, खरप बु., दोनवाडा, कासली गावात पूर आल्याने गावांचा संपर्क तुटला होता. तसेच या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.