वाशिममध्ये वाहतूक नियम जागृतीसाठी ‘महा वॉकेथॉन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 02:57 PM2018-11-18T14:57:44+5:302018-11-18T14:57:52+5:30
वाशिम : रस्ता सुरक्षा, नो-हॉर्न व सुरक्षित वाहन चालविणे आदिंबाबत प्रभावीरित्या जनजागृती करण्यासाठी वाशिम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मागदर्शनाखाली शहरात रविवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथून २ किलोमीटर महा वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रस्ता सुरक्षा, नो-हॉर्न व सुरक्षित वाहन चालविणे आदिंबाबत प्रभावीरित्या जनजागृती करण्यासाठी वाशिम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मागदर्शनाखाली शहरात रविवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथून २ किलोमीटर महा वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये अधिकारी, कर्मचाºयांसह शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
वाहतूक नियमांचे पालन न करता सुसाट वेगाने वाहने चालविणे, गरज नसतानाही हॉर्न वाजवून ध्वनी प्रदुषण करणे यासह अन्य स्वरूपातील चुकीच्या प्रकारांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच सामाजिक स्वास्थही धोक्यात सापडते. यासंबंधी समाजात प्रभावी जनजागृती व्हावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ नोव्हेंबरला वाशिम शहरात ‘महा वॉकेथॉन’ आयोजित करण्यात आले. त्यात कार्यालयीन अधिकारी, कर्मचाºयांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर व त्यांची चमू तसेच शहरातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून वाहतूकीसंबंधी जनजागृती केली.