महान येथे जलवाहिनीची संतप्त नागरिकांकडून तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:43 AM2017-10-24T01:43:32+5:302017-10-24T01:44:38+5:30
महान: स्थानिक ग्रामपंचायतकडे नळ योजनेच्या विद्युत बिलादाखल ६ लाख ५३ हजार २४0 रुपयांची रक्कम थकीत असल्याने, नळ योजनेचा वीज प्रवाह दीड महिन्यापूर्वी वीज कं पनीने खंडित केला होता. तेव्हापासून महानमधील वॉर्ड क्रमांक ३, ४ व ५ मधील नागरिकांना पाणीपुरवठा बंद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
महान: स्थानिक ग्रामपंचायतकडे नळ योजनेच्या विद्युत बिलादाखल ६ लाख ५३ हजार २४0 रुपयांची रक्कम थकीत असल्याने, नळ योजनेचा वीज प्रवाह दीड महिन्यापूर्वी वीज कं पनीने खंडित केला होता. तेव्हापासून महानमधील वॉर्ड क्रमांक ३, ४ व ५ मधील नागरिकांना पाणीपुरवठा बंद आहे.
यामुळे संतप्त नागरिकांनी २२ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजता महाजल योजनेच्या विहिरीवरील जलवाहिनीवरील व एअर व्हॉल्व्हची तोडफोड केली.
जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने महाजल योजनेंतर्गत महान येथे १ कोटी ८0 लाख रुपये खचरून पाणीपुरवठा योजना साकारण्यात आली आहे; परंतु या योजनेतील विहिरीचे हस्तां तरण ग्रामपंचायतला करण्यात आले नाही. दरम्यान, नळ योजनेच्या विद्युत बिलादाखल ६ लाख ५३ हजार २४0 रुपयांची रक्कम थकीत असल्याने महावितरणने नळयोजनेचा वीज प्रवाह दीड महिन्यांपूर्वी खंडित केला. ग्रामपंचायत प्रशासनाने इंजिनिअर चव्हाण यांना महाजलच्या विहिरीमधून पाणी घेण्याची तोंडी संम ती मिळवून दिली.
गेल्या दीड महिन्यांपासून त्या विहिरीमधील पाणी ग्रामपंचायत प्रशासन घेत आहे. महान ग्रामपंचायत प्रशासनाने वॉर्ड कॅ. १ व वॉर्ड क्रमांक २ मधील बिहाडमाथा, चिंचखेड झोपडपट्टीमधील नागरिकांना पिण्यास पाणीपुरवठा केला; परंतु वॉर्ड क्रमांक ३, ४ व ५ मधील नागरिकांना या पाण्याचे वाटप केले नाही. त्यामुळे मागील दीड महिन्यांपासून पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या महानमधील तीन वॉर्डामधील नागरिकांनी त्यांना पाणी मिळत नसेल, तर ते कोणालाच मिळून देणार नाही, अशी भूमिका घेऊन २२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता महाजल योजनेच्या विहिरीवरील जल वाहिनी व एअर व्हॉल्व्हची तोडफोड केली. यावेळी ग्रामपंचायतच सरपंच, उपसरपंच, एकही अधिकारी वा कर्मचारी तेथे उपस्थित नव्हता.
पाणी कर वसुलीत ग्रामपंचायत पिछाडीवर
महान ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्रमांक १ ते ५ मध्ये एकूण ५५0 नळजोडणीधारक असून, त्यांच्याकडे मार्च २0१७ पर्यंत एकूण १२ लाख २३ हजार ८९५ रुपयांचा पाणीकर थकीत आहे. नळ योजनेचे वीज प्रवाह खंडित होऊन दीड महिना झाले. या दीड महिन्यांत ग्रामपंचायत प्रशासनाने एकूण ७ हजार २३0 रुपयांचा पाणी कर वसूल केल्याने महान ग्रामपंचायत पाणी कर वसुलीत पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. अशीच पाणी करवसुली सुरू असली, तर किती वर्षानंतर महानवासीयांना पिण्यास पाणी मिळणार?
आठवड्यातून दोन वेळा वसुली
ग्रामपंचायतचे कर्मचारी पाणी करवसुलीकरिता आठवड्यातून दोन वेळा घरोघरी जातात; परंतु त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळ त नसल्याचे संबंधित कर्मचार्यांनी सांगितले.
पाणी कर खात्यात पैसे नाहीत. त्यामुळे २000 रुपयांच्यावर पाणी कर थकीत असणार्या नळजोडणीधारक खातेदारांना नोटीस देऊन त्याबाबत दवंडीही देण्यात आली आहे.
२१ महल भागातील ७0 टक्के पाणी कराची वसुली झालेली आहे. वॉर्ड क्र. २ मधील बिहाडमाथा व चिंचखेड झोपडपट्टीत नवीन नळ जोडण्या दिलेल्या आहेत. महाजल योजनेच्या विहिरीमधून पाणी घेण्यास इंजिनिअर चव्हाण यांची तोंडी संमती घेऊन, वॉर्ड क्र. १ व २ मधील २१ महल, बिहाडमाथा व चिंचखेड झोपडपट्टीत गेल्या दीड महिन्यांपासून पाणी पुरवठा केला जात आहे.
- यास्मीन मो. इरफान, सरपंच, महान.