हिरव्या बोंड अळीत विकसित होतेय बीटीचे विष पचविण्याची क्षमता !

By Admin | Published: October 12, 2015 01:24 AM2015-10-12T01:24:52+5:302015-10-12T01:24:52+5:30

हिरवी बोंड अळी बिगर बीटी कपाशी व भेंडीची कर्दनकाळ ठरत असून बीटीवरही प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Green bund is developed on the ground, the ability to digest BT poison! | हिरव्या बोंड अळीत विकसित होतेय बीटीचे विष पचविण्याची क्षमता !

हिरव्या बोंड अळीत विकसित होतेय बीटीचे विष पचविण्याची क्षमता !

googlenewsNext

अतुल जयस्वाल/अकोला: निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा त्रस्त झालेला असतानाच खरिपातील पिकांवर विविध किडींचे आक्रमण झाले आहे. यात हिरवी बोंड अळी किंवा अमेरिकन बोंड अळी या नावाने ओळखल्या जाणारी बहुभक्षी कीड पिकांसाठी घातक ठरत आहे. किडींना प्रतिकारक असलेल्या बीटी क पाशीतील विष पचविण्याची शक्तीही हिरव्या बोंड अळीमध्ये विकसित होत आहे. त्यामुळे बीटी कपाशीचे काही प्रमाणात, तर बिगर बीटी कपाशीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान या किडीने झाले आहे. तसेच भेंडीचेही मोठे नुकसान या किडीने केले आहे.
हिरव्या बोंड अळीला अमेरिकन बोंड अळी किंवा हरभर्‍यावरील घाटे अळी म्हणून संबोधल्या जाते. अमेरिका खंडात १५ ते २0 लाख वर्षांपूर्वी विकसित झालेली ही कीड युरोप, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया खंडातही आढळून येते. भारतात ही कीड सर्वप्रथम १९२0 मध्ये तामीळनाडू राज्यात आढळून आली. सध्या ही कीड अत्यंत प्रतिकूल हवामान असलेल्या अमेरिकेतील बोलिव्हिया, उरुग्वे, कोस्टारिका ये थेही आढळून येत आहे. यावरून या किडीची प्रतिकूल हवामानातही नुकसान करण्याची क्षमता लक्षात येते. ही कीड जगभरात १८२ विविध वनस्पतींवर उपजीविका करीत असल्याची नोंद आहे. यामध्ये प्रामुख्याने क पाशी, हरभरा, मूग, तूर, सोयाबीन, ज्वारी, सूर्यफूल, तंबाखू, मका, गहू तसेच टमाटे, मिरची व शेंगवर्गीय भाजी िपकांवर आणि शेवंती, निशिगंधा, गुलाब या फुलांवरही आढळून येते. बीटी कपाशी ही बोंड अळय़ांना प्र ितकारक असून, बोंड अळय़ांची मादी बीटी अथवा बिगर बीटी कपाशीवर सारख्याच प्रमाणात अंडी टाक तात. बीटी कपाशीवरील अळय़ा निघाल्यानंतर त्या दोन ते तीन दिवसांत मरतात. त्यामुळे बीटीचे फारसे नुकसान हो त नाही. याउलट बिगर बीटी कपाशीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. राज्यात बहुतांश कपाशी ही बीटी असल्यामुळे या अळय़ांना बीटी कपाशीवर जगण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हळूहळू या अळय़ांमध्ये बीटी कपाशीमधील विष (डेल्टा एन्डोटॉक्सिन) पचविण्याची क्षमता विकसित होत आहे.

यावर्षी आला प्रत्यय
यावर्षी शेतकर्‍यांना ऑगस्ट ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात याचा प्रत्यय आला. सर्वच कापूस उत्पादक जिल्हय़ांमध्ये बिगर बीटी कपाशीवर या अळय़ांचा प्रादुर्भाव २0 ते २५ टक्के पात्या, फुले, बोंडाचे नुकसान एवढा नोंदविल्या गेला. तर बीटी कपाशीवर हा प्रादुर्भाव ५ ते ७ टक्के एवढा होता. भेंडी पिकाचे मात्र या अळीने मोठय़ा प्रमाणात नुकसान केले.

Web Title: Green bund is developed on the ground, the ability to digest BT poison!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.