शेतकर्‍यांच्या हरित स्वप्नावर अखेर फेरले पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:25 AM2017-09-06T01:25:11+5:302017-09-06T01:25:21+5:30

पावसाळा संपत आला, तरी दमदार सार्वत्रिक पाऊस  झालाच नसल्याने विदर्भातील खरीप पिके प्रभावित झाली असून,  सोयाबीन पिकावर एकाच वेळी तीन ते चार जातीच्या कि डींनी हल्ला  केल्याने १७ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर  परिणाम झाला आहे. राज्यातील पिकांची स्थितीही अशीच आहे. या  नैसर्गिक संकटामुळे शेती अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची  शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

The green dream of the farmers! | शेतकर्‍यांच्या हरित स्वप्नावर अखेर फेरले पाणी!

शेतकर्‍यांच्या हरित स्वप्नावर अखेर फेरले पाणी!

Next
ठळक मुद्देविदर्भातील १७ लाख हेक्टरवरील सोयाबीन हातचे गेलेखरीप पिकांची स्थिती चिंताजनक

राजरत्न सिरसाट । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पावसाळा संपत आला, तरी दमदार सार्वत्रिक पाऊस  झालाच नसल्याने विदर्भातील खरीप पिके प्रभावित झाली असून,  सोयाबीन पिकावर एकाच वेळी तीन ते चार जातीच्या कि डींनी हल्ला  केल्याने १७ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर  परिणाम झाला आहे. राज्यातील पिकांची स्थितीही अशीच आहे. या  नैसर्गिक संकटामुळे शेती अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची  शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
विदर्भात यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने पाठ फिरवली. जुलैमध्ये  थोडाफार पाऊस आल्याने शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केली, पण  पेरणीला तीन ते चार आठवडे उशीर झाला होता. त्यामुळे पिकांची स् िथती नाजूकच होती. पुन्हा पावसाचा दीर्घ खंड पडल्याने मुगाच्या  िपकावर प्रतिकूल परिणाम झालाच.सोयाबीनच्या पिकाला फुलोरा  आला होता; तथापि पाऊस आला नाही. ढगाळ वातावरण आणि  वाढलेले तापमान किडींना पोषक ठरले. सोयाबीन पिकांवर तर  चक्रीभुंगा, हेलीकोवर्पा आणि तंबाखूची पाने खाणार्‍या अळी,  किडींनी एकाचवेळी आक्रमण केल्याने हे पीक भुईसापट झाले आहे.  शेकडो शेतकर्‍यांनी या पिकावर नांगर फिरवला आहे. विदर्भात यावर्षी  १७ लाख हेक्टरवर सोयाबीन पीक आहे. यातील सर्वाधिक १३ लाख  ५१ हजार हेक्टर सोयाबीनची पेरणी पश्‍चिम विदर्भातील अकोला,  बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती जिल्हय़ात झालेली आहे.  या पाच जिल्हय़ांतच सर्वाधिक कमी पाऊस झाला आहे. पाऊसच  नसल्याने अर्धरब्बी पेरणी आता होणार नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.  एवढय़ात चागंला, दमदार पाऊस आल्यास रब्बी पेरणीला मात्र उ पयोगी पडू शकतो. त्यासाठी सर्वत्र पावसाची प्रतीक्षा आहे.  आता शे तकर्‍यांची सर्व भिस्त ही कापूस पिकावर आहे. ही पिके सध्या बर्‍या पैकी आहेत. पण, येत्या आठ ते दहा दिवसांत पावसाची नितांत गरज  आहे. पाऊस आल्यास बीटी कापसावर प्रतिकूल परिणाम होण्याची  शक्यता आहे. संरक्षित ओलितासाठी शेततळे, विहीरींमध्ये पाणीच  नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

सोयाबीन उत्पादनाने मोडला होता उच्चांक
मागच्या वर्षी २0१६-१७ मध्ये सोयाबीन उत्पादनाने उच्चांक गाठला  होता. विदर्भात २५0.७२ लाख टन एवढे उत्पादन झाले, तर उत्पन्न  प्रतिहेक्टरी १४.४५ क्विंटल एवढे होते, त्या तुलनेत यावर्षी उत्पादन  सध्यातरी शून्य आहे.

पाऊस नसल्याने खरीप पिकांची स्थिती चिंताजनक असून, सोयाबीन  पिकांवर एकाचवेळी तीन प्रकारच्या किडींनी चाल केली आहे.  सर्वेक्षण सुरू  आहे; पण सोयाबीन पिकांचे उत्पादन प्रचंड घटण्याची  शक्यता आहे.
 - डॉ. मोहन खाकरे,
 ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ, डॉ.पंदेकृवि, अकोला.
-

Web Title: The green dream of the farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.