नांदेड-निजामोद्दीन रेल्वे ‘एक्सप्रेस’ला हिरवी झेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 02:55 PM2019-12-22T14:55:39+5:302019-12-22T14:55:44+5:30
प्रायोगिक तत्वावर या एक्सप्रेसच्या २८ फेऱ्यांना मंजूरी मिळाल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे डीआरयूसीसी सदस्य जुगलकिशोर कोठारी यांनी शनिवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दक्षिण मध्य रेल्वे मंडळाच्यावतीने रेल्वे प्रवाशांसाठी वाशिममार्गे नांदेड ते निजामोद्दीन या मार्गावर नवीन एक्सप्रेस रेल्वे गाडी सुरु केली आहे. प्रायोगिक तत्वावर या एक्सप्रेसच्या २८ फेऱ्यांना मंजूरी मिळाल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे डीआरयूसीसी सदस्य जुगलकिशोर कोठारी यांनी शनिवारी दिली.
दक्षिण मध्य रेल्वे मंडळाच्यावतीने २६ डिसेंबरपासून प्रायोगीक तत्वावर सुरु करण्यात येत असलेली नांदेड-निजामोद्दीन एक्सप्रेस ही रेल्वे जानेवारी, फेबु्रवारी व मार्च महिन्यात जाण्याच्या १४ व येण्याच्या १४ अशा एकूण २८ फेºया करणार आहे. जानेवारी महिन्यात ही गाडी २, ९ ,१६, २३, ३० या तारखांना धावणार असून फेबु्रवारीमध्ये ६, १३, २०, २७ आणि मार्च महिन्यात ५, १२, १९ ,२६ या तारखेला धावणार आहे. परतीच्या प्रवासात निजामोद्दीन येथून २८ डिसेंबरला नांदेडकरिता ही एक्सप्रेस रवाना होईल. जानेवारी महिन्यात ४, ११, १८, २५, फेबु्रवारी महिन्यात १, ८, १५, २२, २९, तर मार्च महिन्यात ७, १४, २१, २८ या तारखांना परतीचा प्रवास असणार आहे. या गाडीची नांदेड येथून सुटण्याची वेळ रात्री ११ वाजताची असेल. पुर्णा, वसमत, हिंगोलीमार्गे, रात्री २.२० वाजता वाशिम रेल्वे स्थानकावर पोहचून अकोला, खंडवा, इटारसी, भोपाल, बिणा, झाशी, आग्रामार्गे निजामोद्दीन दिल्ली येथे जाईल, अशी माहिती नांदेड रेल्वे विभागाचे अधिकारी के.एम. रायुडू यांच्याकडून मिळाल्याचे कोठारी यांनी सांगितले.