पात्र शेतकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:41 AM2017-10-24T01:41:54+5:302017-10-24T01:43:05+5:30
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्याचे काम शासनाच्या यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी १ लाख ९१ हजार १३१ शेतकर्यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्याचे काम शासनाच्या यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी १ लाख ९१ हजार १३१ शेतकर्यांच्या याद्या ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्यांना दीड लाख रु पयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित पर तफेड करणार्या शेतकर्यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ा तील थकबाकीदार शेतकर्यांचे कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्याचे काम २२ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आले. ऑनलाइन भरलेल्या अर्जांच्या पडताळणीत जिल्ह्यात १ लाख ९१ हजार १८७ शे तकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले.
त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकर्यांचा समावेश आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्यांपैकी ५६ शेतकर्यांना १८ ऑक्टोबर रोजी कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्ह्यातील उर्वरित कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या १ लाख ९१ हजार १३१ शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये पात्र ठरलेल्या शेतकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्याचे काम शासनाच्या यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आले आहे.
प्रमाणपत्र दिलेल्या ५६ शेतकर्यांना आज मिळणार प्रत्यक्ष कर्जमाफी!
कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या शेतकर्यांपैकी ५६ शेतकर्यांना गत १८ ऑक्टोबरला कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेल्या या शेतकर्यांच्या कर्ज खात्यात मंगळवार, २४ ऑ क्टोबर रोजी कर्जाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित ५६ शेतकर्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मंगळवारी मिळणार आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार खातेदार शेतकर्यांचा समावेश आहे.
कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्या तील शेतकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अ पलोड’ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आलेल्या ५६ शेतकर्यांच्या कर्ज खात्यात २४ ऑक्टोबरला कर्जाची रक्कम जमा करून कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.
-जी.जी. मावळे
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)