भाकप व आयटकच्या वतीने अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:13 AM2020-12-07T04:13:14+5:302020-12-07T04:13:14+5:30
वारकरी करणार सरकारचे पिंडदान सहाव्या दिवशीही उपाेषण बेदखल; शेटे महाराजाची प्रकृती चिंताजनक अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ...
वारकरी करणार सरकारचे पिंडदान
सहाव्या दिवशीही उपाेषण बेदखल; शेटे महाराजाची प्रकृती चिंताजनक
अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या वारकऱ्यांच्या उपोषणाचा रविवारी सहावा दिवस उजाडला असून, आतापर्यंत सरकारकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय झालेला नाही दुसरीकडे उपोषणामुळे गणेश महाराज शेटे यांची प्रकृती चिंताजनक झालेली आहे. त्यामुळे साेमवार दुपारपर्यंत सरकारने वारकयांची कोणतीही दखल घेतली नाही तर सरकार आमच्याकरिता मेले, असे गृहीत धरून वारकऱ्यांच्या वतीने तेरवी अन् पिंडदान केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
रविवारी उपोषणामध्ये गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांची प्रवचन सेवा पार पडली. महाराजांनी अतिपरखड शब्दांमध्ये सरकारवर टीका केली. सरकारच्या पिं दान कार्यक्रमात धर्माचार्य गजानन महाराज दहीकर हे कीर्तन करतील, असे त्यांनी सांगितले. उपाेषण मंडपाला आमदार गोवर्धन शर्मा, माजी आ. तुकाराम बिडकर आदींसह महादेव महाराज निमकडे, विठ्ठल महाराज साबळे, गजानन महाराज महल्ले, राम महाराज गवारे, तुलशीदास महाराज मसने, शिवा महाराज बावस्कर, प्रवीण महाराज कुलट, ज्ञानेश्वर महाराज पातोड, श्रीधर महाराज तळोकार, श्याम महाराज साबळे विजय महाराज राऊत, देवेंद्र मार्के महाराज, गणेशराव लांडे, विलास महाराज कराड, माधवराव बकाल, धनेश्वर साबळे, किशोर फुलकर, मधुकर गवारे यांनी भेट दिली.