‘साऊची शाळा’ लघुनाट्यातून क्रांतिज्योतीला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:16 AM2021-01-04T04:16:39+5:302021-01-04T04:16:39+5:30

खंडाळा : भारत वर्षातील स्त्रीशक्तीला शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त ‘साऊची शाळा’ या लघुनाट्यातून जिल्हा ...

Greetings to Krantijyoti from the short play 'Sauchi School' | ‘साऊची शाळा’ लघुनाट्यातून क्रांतिज्योतीला अभिवादन

‘साऊची शाळा’ लघुनाट्यातून क्रांतिज्योतीला अभिवादन

Next

खंडाळा : भारत वर्षातील स्त्रीशक्तीला शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त ‘साऊची शाळा’ या लघुनाट्यातून जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा येथील विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.

सावित्रीने मुलींना शिक्षणाची विपरित काळात दिलेली दीक्षा लघुनाट्यातून विद्यार्थ्यांनी सादर केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती यावर्षीपासून महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. यानिमित्त शाळेत भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा व तीन गटात रंगभरण स्पर्धा ऑनलाइन आयोजित केल्या होत्या.

महिला शिक्षण दिनानिमित्त शाळेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नव्यानेच तयार केलेल्या शालेय क्रीडांगणावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी इन्स्पायर अवॉर्डकरिता प्रतिकृती तयार करणारी विद्यार्थिनी ईश्वरी गजानन गोलाईत व मार्गदर्शक शिक्षिका सुरेखा ब्रह्मदेव हागे यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शैला खंडेराव, शिक्षणप्रेमी सदस्य दिनकर धूळ, पालक प्रतिनिधी चंदा खंडेराव, युवराज खंडेराव, मुख्याध्यापिका शीला टेंभरे, श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, तुलसीदास खिरोडकार, सुरेखा हागे, राजेंद्र दिवनाले, गोपाल मोहे, निखिल गिऱ्हे व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अध्यापक तुलसीदास खिरोडकार व सुरेखा हागे यांनी केले. आभार निखिल गिऱ्हे यांनी मानले.

Web Title: Greetings to Krantijyoti from the short play 'Sauchi School'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.