सौंदळा येथे महामानवास अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:16 AM2021-04-19T04:16:37+5:302021-04-19T04:16:37+5:30

---------------------------------------------- कंचनपूर-हातरुन रस्त्याची दुरवस्था हातरूण: परिसरातील कंचनपूर-हातरून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. वाहनचालकांना या मार्गावरून ये-जा करताना तारेवरची ...

Greetings to Mahamanavas at Saundala | सौंदळा येथे महामानवास अभिवादन

सौंदळा येथे महामानवास अभिवादन

Next

----------------------------------------------

कंचनपूर-हातरुन रस्त्याची दुरवस्था

हातरूण: परिसरातील कंचनपूर-हातरून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. वाहनचालकांना या मार्गावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. किरकोळ अपघाताच्या घटनादेखील वाढल्या आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांसह वाहनचालकांकडून होत आहे.

-------------------------------

बांधावरच भाजीपाला विक्रीला प्रतिसाद

बाळापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या बांधावरच भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले आहे. ‘विकेल ते पिकेल’ या योजनेत तालुक्यातील तब्बल दोनशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

--------------------------------

ग्रामीण भागात वीज कापण्याची मोहीम

पातूर: कोरोना संसर्गामुळे एक वर्षापासूनची बिकट परिस्थिती, पिकांचे नुकसान व मजूर वर्गाच्या हाताला काम नसल्यामुळे स्वत:चा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात महावितरणने बिल थकलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे.

----------------------------------------

संत्रा उत्पादकांना हवा मदतीचा हात

अकोट: तालूक्यातील रोहणखेड, बोर्डी शिवारात गत पाच दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस व सौम्य प्रमाणा गारपीट झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे हरभरा, गहू, कांदे, भाजीपाला, संत्री या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे.

----------------------------------------

बँक, कार्यालयासमोर पार्किंगचा प्रश्न

पातूर: दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने विविध शासकीय कार्यालयांसह रुग्णालय व बँकांसमोर पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक बँकांसमोर वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे दिवसेंदिवस कठीण होत असलेल्या पार्किंगच्या समस्येवर पालिका व पोलीस प्रशासनाने तोडगा काढणे गरजेचे आहे.

---------------------------

महसूलची कारवाई थंड बस्त्यात

कवठा: घरकुलासाठी रेती उपलब्ध करण्यासाठी भटकणाऱ्या नागरिकांची वणवण महसूलला दिसत नाही. मात्र, बाळापूर तालुक्यातील कवठा परिसरातील पूर्णा नदीपात्रातून दिवसाढवळ्या रेतीचे अवैध उत्खनन सुरू असल्याचे चित्र असून, याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

------------------------

देगाव-कान्हेरी रस्ता खड्ड्यात

देगाव : बाळापूर तालुक्यातील देगाव-कान्हेरी गवळी मार्गावर वाहनचालक व पादचाऱ्यांना या मार्गावरून कसरत करून प्रवास करावा लागत आहे. गतवर्षी या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. परंतु, अवघ्या काही दिवसातच डांबरीकरण उखळत असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

-----------------------------------------------------

वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करा

मूर्तिजापूर : वनविभागाचे जिल्ह्यामध्ये मोठे जंगल आहे. या जंगलात वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. आता उन्हाळा सुरू होताच या वनातील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. यामुळे वन्य प्राणी पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहे. त्यामुळे ते शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या पाण्यासाठी पाणवठे तयार करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

------------------------------------------------------

पुन्हा वाढला प्लास्टिक पिशव्यांचा वापर

बार्शीटाकळी: शहरासह ग्रामीण भागात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लास्टिकचा कचरा दिसत असून, शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे. प्रदूषणात होणारी वाढ थांबविण्यासाठी प्लास्टिक पिशव्या बंद करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. या प्लास्टिकमुळे प्रदूषणात वाढ हाेत आहे.

----------------------------------------------------------

पाळीव प्राण्यांच्या संख्येत झाली घट

तेल्हारा: ग्रामीण भागातील दुग्धव्यवसाय आधुनिकीकरणामुळे मोडकळीस येत असल्याचे चित्र सर्वत्र आहे़. पूर्वी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या घरी गाई, म्हशी राहत होत्या. आता मात्र प्राण्यांवरील खर्चही परवडणारा नाही. त्यामुळे शेतीत यांत्रिकीकरण वाढले. शेतात मशागतीसाठी असलेल्या बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे.

------------------------------------------------

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

निहिदा : परिसरात वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. या समस्येकडे वीजवितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक शासकीय कामे खंडित होत आहे, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.

---------------------------------------------

जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी

नया अंदुरा : बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा परिसरात मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून, जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याशिवाय सध्या बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे ट्रकांद्वारे ओव्हरलोड वाळू व मुरुम वाहतूक करीत आहेत.

------------------------------------

बाभूळगाव-माझोड रस्त्याची दयनीय अवस्था

पातूर: तालुक्यातील बाभूळगाव-माझोड या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. परिसरातील गावांमधील ग्रामस्थांना अकोलाकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

---------------------------------------

व्हायरल फिव्हरमुळे नागरिक हैराण

बोरगाव मंजू : मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदल व रस्त्याचे काम सुरू असल्याने सगळीकडे धूळ आहे. व्हायरल फिव्हर तसेच सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास अशा विविध आजारांनी नागरिक हैराण असून दवाखाण्यात रुग्णांची गर्दी वाढली.

--------------------------------

नियोजित वेळेत बसेस सोडण्याची मागणी

खनापूर: बसफेरी वेळेवर सोडण्यात येत नसल्याने नागरिकांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत. लाॅकडाऊननंतर ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू झाल्या. परंतु, त्यांच्या वेळा निश्चित केलेल्या नाहीत. त्यामुळे बसफेरी नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Greetings to Mahamanavas at Saundala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.