चरख्यावर सूतकताई करून महात्मा गांधींना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 04:14 PM2019-01-30T16:14:43+5:302019-01-30T16:14:49+5:30

अकोला: राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने बुधवार, ३० जानेवारी रोजी गांधी- जवाहर बागेत चरख्यावर सुतकताई करून राष्ट्रपीत्याला अभिवादन केले

Greetings to Mahatma Gandhi by plowing the scarf | चरख्यावर सूतकताई करून महात्मा गांधींना अभिवादन

चरख्यावर सूतकताई करून महात्मा गांधींना अभिवादन

Next

अकोला: राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने बुधवार, ३० जानेवारी रोजी गांधी- जवाहर बागेत चरख्यावर सुतकताई करून राष्ट्रपीत्याला अभिवादन केले.
सर्वोदय मंडळाच्यावतीने दरवर्षी महात्मा गांधींच्या पुण्यतिथी निमित्त गांधी-जवाहर बागेतील सभागृहात सुतकताई करुन अभिवादन केले जाते. गत साठ वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. यामध्ये जिल्ह्यातील ज्येष्ठ गांधीवादी सुतकताई करतात. या वर्षीही सर्वोदय मंडळाच्यावतीने बुधवारी सुतकताई यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, अ‍ॅड. रामसिंह राजपूत, डोंगरे गुरुजी, श्रीकृष्ण वाघमारे, वसंतराव केदार, बबनराव कानकिरड, शंकरराव सरप, डॉ. मिलिंद निवाणे, रामदास शेळके, रामभाऊ राऊत, बंडूभाऊ ढोमणे, आकाश इंगळे, गुरुचरणसिंह यदू आदींची उपस्थिती होती.

 

Web Title: Greetings to Mahatma Gandhi by plowing the scarf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.