गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:20 AM2021-02-24T04:20:14+5:302021-02-24T04:20:14+5:30
जनजागृती सप्ताहाचे आयोजन अकोला- सहाय्यक कामगार आयुक्त विभागामार्फत 22 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत किमान वेतन अधिनियमाची प्रभावीपणे ...
जनजागृती सप्ताहाचे आयोजन
अकोला- सहाय्यक कामगार आयुक्त विभागामार्फत 22 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत किमान वेतन अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणीकरीता जनजागृती सप्ताह आयोजीत करण्यात आले आहे. किमान वेतन अधिनियमानुसार कामगारास किमान वेतन धनादेश किवा बँकेमार्फत देणे बंधनकारक आहे.
निवृत्त वेतनाला विलंब हाेणार
अकोला फेब्रुवारीच्या मासिक निवृत्ती वेतन देयकातुन नियमानुसार आयकराची कपात करणे आवश्यक असून याबाबतची कार्यवाही सुरु आहे त्यामुळे माहे फेब्रुवारी 2021 चे मासीक निवृत्ती वेतन विलंबाने 5 मार्च पर्यंत होणे अपेक्षित आहे. अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी म.भा. गोरेगांवकर यांनी दिली आहे
लर्निंग लायसन्सचे कामकाज बंद
अकोला- कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये याकरीता उपाययोजनांचा एक भाग म्हणून शिकाऊ अनुज्ञप्ती 23 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत परीक्षेकरिता उपस्थितीत राहण्याची तारिख व वेळ मिळालेल्या उमेदवारांनी या कालावधीत कार्यालयात येवु नये. त्यांना उपस्थितीत राहण्याकरिता नंतर तारीख कळविण्यात येईल असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले.