जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिनानिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:17 AM2021-03-24T04:17:23+5:302021-03-24T04:17:23+5:30
--- कोषागरे व बॅंका रात्री दहापर्यंत सुरू ठेवा अकोला : शासकीय अर्थ व्यवहाराकरिता बुधवार, ३१ रोजी जिल्ह्यातील कोषागरे ...
---
कोषागरे व बॅंका
रात्री दहापर्यंत सुरू ठेवा
अकोला : शासकीय अर्थ व्यवहाराकरिता बुधवार, ३१ रोजी जिल्ह्यातील कोषागरे व बॅंका रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवाव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. शासनाचे सर्व जमा व खर्चाचे आर्थिक व्यवहार सुरळीत व त्याच दिवशी पूर्ण होणे आवश्यक असल्याने हे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
०००००
एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
अकोला : राज्य बाल संरक्षण संस्था, पुणे यांच्या आदेशानुसार मूर्तिजापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचे ग्राम बाल संरक्षण समितीबाबत प्रशिक्षण कार्यशाळा शुक्रवार रोजी पंचायत समिती मूर्तिजापूर येथे घेण्यात आली. त्यानुसार एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, मूर्तिजापूर तालुक्यातील मुर्तिजापूर येथील दोन, कुरुम दोन, पारद सर्कलनिहाय २५ तथा जामठी बु. धोत्रा शिंदे, मूर्तिजापूर एक सर्कलनिहाय २५ ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य सचिव, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
या कार्यशाळेचे उद्घाटन गटविकास अधिकारी बायस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती उईके प्रमुख मार्गदर्शक होत्या. या कार्यक्रमाला अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती कंझरकर, सांख्यिकी अधिकारी राठोड उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे समुपदेशक सचिन घाटे यांनी केले, तर कार्यशाळेमध्ये विधि तथा परिवीक्षा अधिकारी ॲड. संगीता कोंडाणे, सामाजिक कार्यकर्ता सतीश राठोड यांनी मार्गदर्शन केले.
०००००
विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना
अकोला : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. सन २०१९-२० मधील ज्या पात्र विद्यार्थ्यांना प्रथम टप्प्याचा लाभ मिळालेला आहे व ज्या विद्यार्थ्यांना अद्यापि द्वितीय टप्प्याचा लाभ मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांनी ३१ मार्चपूर्वी प्रपत्र जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.