सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:17 AM2021-01-04T04:17:10+5:302021-01-04T04:17:10+5:30
गाडगेबाबा प्रतिष्ठानतर्फे आरोग्य शिबिर अकोला : संत गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान व संत गजानन महाराज मंदिर संस्थान, देशमुखपेठ यांच्यातर्फे नि:शुल्क ...
गाडगेबाबा प्रतिष्ठानतर्फे आरोग्य शिबिर
अकोला : संत गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान व संत गजानन महाराज मंदिर संस्थान, देशमुखपेठ यांच्यातर्फे नि:शुल्क आरोग्य शिबिर घेण्यात आले. हे शिबिर सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी प्रा. डॉ. संजय तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विक्रांत इंगळे, डॉ. आकाश मलातपुरे, डॉ. संदीप वानखडे, डॉ. नीलेश गायकवाड यांनी १५० नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली.
कृषी विद्यापीठात सावित्रीबाई फुले जयंती
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे रविवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. या प्रसंगी कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंती कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
भांडपुरा पोलीस चौकी परिसरात अस्वच्छता
अकोला : जुने शहरातील भांडपुरा पोलीस चौकी परिसरात नागरिकांकडून रस्त्याच्या बाजूलाच कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. घंटागाडी येऊनही नागरिकांकडून कचरा रस्त्यावर टाकण्यात येत आहे. हा प्रकार आरोग्यासाठी घातक असून, याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
जीएमसीतील दिव्यांग कक्ष सुरू
अकोला : कोरोनामुळे मागील दहा महिन्यांपासून बंद असलेले सर्वोपचार रुग्णालयातील दिव्यांग कक्ष शुक्रवारपासून पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यासोबतच ओपीडीमध्ये तपासणीची चौकशी करण्यासाठी शनिवारी दिव्यांग बांधवांसोबतच त्यांच्या नातेवाइकांनी दिव्यांग कक्षाला भेट दिली होती. बुधवार आणि गुरुवारी दिव्यांगांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.