यंग ब्रिगेडच्या वतीने शाहू महाराजांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:14 AM2021-06-28T04:14:29+5:302021-06-28T04:14:29+5:30
फाेटाे ................. आदर्श गोसेवा प्रकल्पाला रुग्णवाहिका अकोला : जिल्ह्यात गोरक्षण व गोसंवर्धन क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या स्थानीय आदर्श गोसेवा अनुसंधान ...
फाेटाे
.................
आदर्श गोसेवा प्रकल्पाला रुग्णवाहिका
अकोला : जिल्ह्यात गोरक्षण व गोसंवर्धन क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या स्थानीय आदर्श गोसेवा अनुसंधान प्रकल्पाला जिल्हा शिवसेनेच्या वतीने अद्यावत रुग्णवाहिका देण्यात आली. यावेळी जिल्हा शिवसेनाप्रमुख, आमदार नितीन देशमुख यांनी आदर्श गोसेवा संस्थेचे अध्यक्ष सुभाष जैन यांना रुग्णवाहिकेची चावी प्रदान केली. यावेळी आदर्श गोसेवा प्रकल्पाचे ज्येष्ठ पदाधिकारी ॲड. मोतीसिंह मोहता, संस्थेचे सचिव प्रा. विवेक बिडवई, आदर्श गोसेवा प्रकल्प आलेगाव येथील गो समितीचे अध्यक्ष तथा पातूर सेना तालुका रवींद्र मुर्तडकर, माजी सरपंच बबनराव काळदाते, अमोल गिरे, पुरुषोत्तम आवटे व नागरिक उपस्थित होते.
फाेटाे
........................
कामा प्लॉट परिसरातील नाल्यांची दुरवस्था
अकोला : स्थानीय टॉवर चौकापासून तो शुक्ला बालरुग्णालयपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्हीकडेस असणाऱ्या सार्वजनिक नाल्यांची दुरवस्था झाली असून, पावसाळ्यात या नाल्यात कचरा साचल्यामुळे नाल्यांचे पाणी परिसरातील प्रतिष्ठान व दुकानात घुसत आहे.
.........
मीडिया सुरक्षा फोरमच्या जिल्हाध्यक्षपदी पटेल
अकोला : भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी अन्सार पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. चंद्रपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या फोरमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अय्युबभाई कच्छी यांनी अन्सार पटेल यांची नियुक्ती केली.
.....
गृहोपयोगी साहित्य वितरित
अकोला : स्थानीय मारवाडी युवा मंचच्या अकोला उदय शाखेच्या वतीने विवाहबद्ध हाेत असलेल्या गरीब कन्येस पन्नास हजार रुपयांचे गृहोपयोगी साहित्य वितरित केले. उदय शाखेने या मुलीला बहीण मानून तिला पन्नास हजार रुपयांचे गृहोपयोगी साहित्य व दागिने प्रदान करून आपले सामाजिक दायित्व निभावले. समाजसेवी आशा गोयंका यांच्या आर्थिक पुढाकाराने स्थानीय राधेनगर परिसरात अखिल भारतीय मारवाडी युवा मंचचे निवर्तमान राष्ट्रीय उपाध्यक्ष निकेश गुप्ता, प्रांतीय उपाध्यक्ष मनोज अग्रवाल, सतीश गोयंका, अभिषेक सोनालावला, प्रतुल भारूका, अकोला उदय शाखेचे अध्यक्ष कुशल गोयंका, सचिव आशिष सारडा, कोषाध्यक्ष शुभम बियाणी आदी मान्यवर वर्गाच्या उपस्थितीत पारंपरिक लग्न करणाऱ्या या मुलीस सामग्री प्रदान करण्यात आली.
फाेटाे
....