घोडा-गाडीचा थाट नाही; नवरदेव, नवरी चालत पोहोचले लग्नाला; ग्रामपंचायतमध्ये केला नोंदणी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 06:59 PM2020-04-19T18:59:19+5:302020-04-19T19:00:04+5:30

चार-पाच नातेवाइकांसह चक्क पायदळ जात नोंदणी विवाह करून कोरोना ‘सोशल डिस्टन्स’ व खबरदारी पाळत विवाह केला.

Groom- bride walking to the wedding; Registration of marriage in the Gram Panchayat | घोडा-गाडीचा थाट नाही; नवरदेव, नवरी चालत पोहोचले लग्नाला; ग्रामपंचायतमध्ये केला नोंदणी विवाह

घोडा-गाडीचा थाट नाही; नवरदेव, नवरी चालत पोहोचले लग्नाला; ग्रामपंचायतमध्ये केला नोंदणी विवाह

Next

- सत्यशील सावरकर

तेल्हारा : राज्यात कोरोना कहर सुरूच आहे. त्यामुळे ‘लॉकडाउन’ वाढतच आहे. आधीच ठरलेले लग्न पुढे न ढकलता एकाच गावातील नवरदेव-नवरी असलेल्या जोडप्याने ग्रामपंचायत कार्यालयात घरापासून चार-पाच नातेवाइकांसह चक्क पायदळ जात नोंदणी विवाह करून कोरोना ‘सोशल डिस्टन्स’ व खबरदारी पाळत विवाह केला.
लग्न म्हटले म्हणजे घोडा, गाडी, पाहुणे मंडळी, हौस, मजा आलीच. त्यात नवरदेव-नवरी एकाच गावातील असल्यास मित्र, नातेवाईक व दोन्हींकडील कार्यक्रमामध्ये उत्साह वाढतो. तालुक्यातील गाडेगाव येथील श्रीधर मनोहर मिरगे यांचे चिरंजीव अंकुश नवरदेव व गावातीलच अरुण रामराव वाकोडे यांची कन्या माधुरी नवरी यांचा विवाह कोरोना विषाणू संसर्ग खबरदारी व ‘लॉकडाउन’ काळात पाडावयाची सतर्कता पाळून अगदी ठरल्याप्रमाणे कुठलाही लवाजमा न करता मोजक्या मंडळीत ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी पद्धतीने करण्यात आला. सरपंच प्रमोद वाकोडे यांच्या हस्ते वर अंकुश श्रीधर मिरगे व वधू माधुरी अरुण वाकोडे यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी केशवराव ताथोड, संजय वडतकार, मुरलीधर सोनोने, विजय बोर्डे, गोकुळ हिंगणकार, काशीनाथ वाकोडे, नातेवाईक व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Groom- bride walking to the wedding; Registration of marriage in the Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.