गटविकास अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:21 AM2021-02-24T04:21:14+5:302021-02-24T04:21:14+5:30
अकोट शहर कोरोनाच्या पॉझिटिव्ह आकडेवारीने भीती निर्माण झाली आहे. प्रतिबंधक क्षेत्रासह दुपारी ३ नंतर लाॅकडाऊन करण्यात आले आहे, मात्र ...
अकोट शहर कोरोनाच्या पॉझिटिव्ह आकडेवारीने भीती निर्माण झाली आहे. प्रतिबंधक क्षेत्रासह दुपारी ३ नंतर लाॅकडाऊन करण्यात आले आहे, मात्र चाचणी अहवालातील आकडे पाहता शहरात अशी स्थिती का निर्माण झाली, याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. अहवालात खुद्द गटविकास अधिकारी शिंदे हे
पॉझिटिव्ह निघाल्याची माहीती पुढे आली आहे. ते विलगीकरणात उपचार घेत आहेत. त्यामुळे अकोट पंचायत समिती क्षेत्रातील ग्रामीण भागातील धुरा कोणाकडे आहे याबद्दल खुद्द प्रशासन अनभिज्ञ आहे. पंचायत समिती स्तरांवर गावागावांत जबाबदार अधिकाऱ्यांना कोरोना प्रादुर्भाव वाढु नये, याकरीता मुख्यालयी हजर ठेवणे आवश्यक झाले आहे.
.............
अनेक व्यापारी पाॅझिटिव्ह, काहींनी टाळली चाचणी
अकोट शहरातील अनेक बडे व्यापारी हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचेवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, मंगळवारी शहरातील बाजारपेठत फुटपाथवरील तसेच दुकानदार यांचे आॅन द स्पाॅट कोरोना चाचणी नमुने घेतले. याप्रंसगी अनेकांनी दुकानातून काढता पाय घेत नमुने देणे टाळल्याचे दिसून आले. यावेळी महसुल, आरोग्य, नगरपालिका व पोलीस पथक बाजारपेठेत हजर होते.
...................
प्रमुख मार्गावर नाकाबंदी, दंडात्मक कारवाई सुरूच
दरम्यान, अकोट तालुका व शहराला जोडणारे प्रमुख मार्गावर पोलिसांनी कडक नाकाबंदी ठेवली आहे. विचारपूस करुन आवश्यक कामासाठी एन्ट्री देण्यात येत आहे, तर नगरपालिका पथकाने नियम न पाळणारे दुकानदार व नागरिकांवर दंडात्मक कारवाई चा सपाटा सुरुच आहे. कोरोना परिस्थिती नियत्रंणात ठेवण्यासाठी महसुल विभाग आवश्यक उपाययोजना करण्यासाठी शहरात मार्गक्रमण करत असल्याचे दिसून येत आहे.