जीएसटी पोर्टल पुन्हा पडले बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:42 PM2018-12-21T12:42:21+5:302018-12-21T12:42:39+5:30
अकोला : वस्तू आणि सेवा करचे आॅनलाइन पोर्टल ऐन कर भरणा प्रक्रियेच्या वेळी बंद पडल्याने व्यापारी-उद्योजक त्रासले आहेत.
अकोला : वस्तू आणि सेवा करचे आॅनलाइन पोर्टल ऐन कर भरणा प्रक्रियेच्या वेळी बंद पडल्याने व्यापारी-उद्योजक त्रासले आहेत. दीड लाख करदात्यांनी आताच भरणा केलेला आहे, त्यामुळे काही वेळ थांबा, असा संदेश जीएसटीच्या आॅनलाइन पोर्टलवर करभरणा करणाऱ्यांना मिळत आहे. ऐन कर भरणाच्या अखेरच्या चरणात जीएसटीचे पोर्टल बंद पडत असल्याने शासनाच्या आॅनलाइन क्षमतेवरच प्रश्नचिन्ह लागत आहे.
वस्तू आणि सेवा कर भरणाच्या प्रत्येक तारखेला जीएसटीच्या पोर्टलवर समस्या असते. कधी नेटवर्क नसते तर कधी एरर येतो. आॅनलाइन नेटवर्कींग सिस्टम सक्षम करण्यावर जीएसटी परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली; मात्र अजूनही पोर्टल सक्षम होऊ शकले नाही. गत दोन दिवसांपासून पुन्हा जीएसटी पोर्टल बंद पडल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्याचा फटका व्यापाºयांना सोसावा लागतो आहे. जीएसटी अधिकाºयांकडे करभरणा सल्लागारांनी तक्रारी नोंदविल्या असता, याची तक्रारही आॅनलाइन करण्याचे सल्ले मिळत आहेत.