विठ्ठल आॅइलच्या वाशिम, अकोला कार्यालयात जीएसटीची सर्च मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 03:12 PM2019-02-01T15:12:14+5:302019-02-01T15:12:20+5:30

अकोला : पश्चिम विदर्भात प्रख्यात असलेल्या विठ्ठल आॅइल फर्मचे संचालक रुहाटिया यांच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि अकोला किराणा बाजारातील ओमप्रकाश शिवप्रकाश या कार्यालयात अमरावती जीएसटी कार्यालयाने सर्च मोहीम राबविली.

GST's search campaign at Witthal oil's Washim, Akola office | विठ्ठल आॅइलच्या वाशिम, अकोला कार्यालयात जीएसटीची सर्च मोहीम

विठ्ठल आॅइलच्या वाशिम, अकोला कार्यालयात जीएसटीची सर्च मोहीम

Next

 - संजय खांडेकर
अकोला : पश्चिम विदर्भात प्रख्यात असलेल्या विठ्ठल आॅइल फर्मचे संचालक रुहाटिया यांच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि अकोला किराणा बाजारातील ओमप्रकाश शिवप्रकाश या कार्यालयात अमरावती जीएसटी कार्यालयाने सर्च मोहीम राबविली. २०१६-१७ च्या व्हॅटच्या रिटर्नमध्ये तफावत आढळून आल्याने ही सर्च मोहीम राबविली.
अमरावती येथील जीएसटी कार्यालयाचे राज्य कर आयुक्त तेजराव पाचरणे यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. अमरावतीच्या पथकाने बुधवारी अकोल्यात येऊन अकोला जीएसटी कार्यालयाकडून अतिरिक्त सहकाऱ्यांची मदत घेतली. त्यानंतर वाशिम जिल्ह्याच्या रिसोड येथील विठ्ठल आॅइल प्रोडक्ट मिल्स आणि अकोल्यातील किराणा बाजारातील ओमप्रकाश शिवप्रकाश कार्यालयास अकस्मात भेट देत सर्च मोहीम सुरू केली. २०१६-१७ मधील व्हॅट रिटर्नच्या आकडेवारीतील तफावतीवर बोट ठेवून ही कारवाई करण्यात आली. मागिल व्हॅटचे रिफंड मिळण्यासाठी विठ्ठल आॅइल प्रोडक्टचे संचालक रुहाटिया यांनी जीएसटी कार्यालयाकडे रिफंड क्लेम केला आहे. यासंदर्भात अकोला जीएसटी कार्यालय, अमरावती कार्यालय प्रकरण प्रलंबित आहे. दोन्ही ठिकाणच्या सर्च मोहिमेमध्ये अमरावती येथील सात आणि अकोल्यातील बारा अधिकारी सहभागी झाले होते. सोयाबीन, सनफ्लावर आणि फल्ली असे तीन नामांकित ब्रॅण्ड विठ्ठल आॅइलचे आहेत. 
जीएसटी कार्यालयाच्या एका पथकाने गुरुवारी एमआयडीसीच्या एका आॅईल मिल्सवरही अकस्मात भेट देऊन सर्च मोहीम सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत मात्र यासंदर्भात अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.


-बुधवारी जीएसटीच्या पथकाने कार्यालयात येऊन व्हॅटच्या दस्तऐवजांची पाहणी केली. भरणा केलेल्या व्हॅटचा रिफंड क्लेम आम्ही केला आहे. अधिकाºयांनी तपासणीचे काम केले. आम्ही दस्तऐवज दाखविण्याचे काम केले. त्यांचे समाधानही झाले आहे.
-श्रीप्रकाश रुहाटिया, संचालक विठ्ठल आॅइल.
 

 

Web Title: GST's search campaign at Witthal oil's Washim, Akola office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.