हरभऱ्याला हमीभाव ५,१००, बाजारभाव ५,१००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:24+5:302021-04-10T04:18:24+5:30
केंद्र सरकारने या वर्षी ३०० रुपये वाढ देऊन ५,१०० रुपये प्रतिक्विंटल किमान आधारभूत किंमत (हमीभाव) निर्धारित केली. जिल्ह्यात हरभरा ...
केंद्र सरकारने या वर्षी ३०० रुपये वाढ देऊन ५,१०० रुपये प्रतिक्विंटल किमान आधारभूत किंमत (हमीभाव) निर्धारित केली. जिल्ह्यात हरभरा खरेदीला सुरुवातही केली. आतापर्यंत २ हजार १६४ शेतकऱ्यांकडून ३७ हजार ४६३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला, परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल ४,४५० ते ५,१०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी शासनाच्या हमीभाव केंद्रापेक्षा बाजार समितीत हरभरा विक्रीसाठी पसंती देत आहेत.
--बाॅक्स--
सात दिवसांत १२ हजार क्विंटल आवक
शहरातील बाजार समितीत हरभऱ्याला हमीदराच्या बरोबर भाव मिळत आहे. त्यामुळे आवकही वाढली आहे. शुक्रवारी २ हजार २७० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती. मागील ७ दिवसांत १२ हजार १०८ क्विंटल आवक झाली आहे.
--कोट--
हमीभाव केंद्रावर व बाजार समितीत सारखाच भाव मिळत आहे. बाजार समितीत तत्काळ पैसे मिळत असल्याने हरभरा तिथेच विकला.
अशोक सदाफळे, शेतकरी, उमरा