अकोला महापालिकेच्या कामकाजावर पालकमंत्री नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 02:28 PM2018-12-02T14:28:15+5:302018-12-02T14:29:13+5:30
अकोला : महापालिकेतील काँक्रिट मार्गाचे सोशल आॅडिट झाले. आता पुढे काय, असा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारला असता, त्यांनी महापालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
अकोला : महापालिकेतील काँक्रिट मार्गाचे सोशल आॅडिट झाले. आता पुढे काय, असा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारला असता, त्यांनी महापालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. जे आयुक्त शहरात थांबत नाहीत, आजारामुळे रजेवर असतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची, असेही ते बोलले. नवीन आयुक्त येणार आहे का, अशी विचारणा केली असता, त्यांनी हसून वेळ काढून नेली. कामात दिरंगाई आणि इतरांवर ठपका ठेवून कामे रेंगाळत ठेवणाऱ्या अधिकाºयांचा शोध घेऊन आता कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दिलेल्या वेळेच्या आत बांधकाम झाले नाही, तर इस्टिमेट वाढते. अप्रत्यक्षपणे शासनाचे नुकसान होते. यापुढे असे होऊ नये, यासाठीच ही सर्व अधिकाºयांची आढावा बैठक घेण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालय ते पंचायत समिती मार्गांचे काँक्रिटीकरण शासकीय कार्यालयांच्या अतिक्रमणामुळे थांबले. यासंदर्भात प्रश्न केला असता, त्यांनी जिल्हा परिषदेसह या मार्गावरील सर्व शासकीय कार्यालयांचे अतिक्रमण पाडा, असे मी आधीच सांगितले आहे, असे ते म्हणाले.
अपेक्षा नसताना मिळाले हे समाधान
राज्यातील अधिकाºयांसह केंद्राचे अधिकारी शनिवारी पालकमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होते. त्यावर पत्रकारांनी, पालकमंत्र्यांनी केंद्राकडे तर तुमची वाटचाल नाही ना, असा प्रश्न केला. त्यावर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी स्पष्ट नकार दिला. अपेक्षा नसताना मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची खाती हाताळली, त्यातच समाधान आहे, असे त्यांनी उत्तर दिले.
तापडिया नगराचा ओव्हरब्रिज लवकरच!
न्यू तापडिया नगराला जोडणाºया ओव्हरब्रिजचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्याचे टेंडर आदेश निघत असल्याची माहितीही त्यांनी येथे दिली.