पालकमंत्र्यांकडून जिल्हा स्त्री रुग्णालयाची पाहणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 11:29 AM2020-10-07T11:29:03+5:302020-10-07T11:29:52+5:30
Bacchu Kadu, Akola Lady Harding hospital बच्चू कडू यांनी मंगळवारी जिल्हा स्त्री रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली.
अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी जिल्हा स्त्री रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरती कुलवाल आदी उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात निर्माण करण्यात आलेल्या कोविड कक्षातील सुविधांची पाहणी केली, तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णालयातील सेवा, सुविधांबाबत आढावा घेतला.
-
कर्मचाऱ्याने मागितले शंभर रुपये
लेडी हार्डिंग्जमधील एका कर्मचाºयाने शंभर रुपये मागितल्याची तक्रार एका रुग्णाच्या नातेवाइकाने बच्चू कडू यांच्याकडे केली. यावर पालकमंत्र्यांनी संबंधित कर्मचाºयावर कारवाई करण्याचे निर्देश डॉ. कुलवाल यांना दिले.
पालकमंत्र्यांकडून स्त्री रुग्णालयाची पाहणी!