पालकमंत्र्यांनी धुतले विरमातांचे पाय, प्रेमाने भरवला घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 10:21 AM2021-08-16T10:21:49+5:302021-08-16T10:24:45+5:30

Bacchu kadu स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहिदांच्या कुटूंबियांसमवेत पालकमंत्र्यांनी स्नेह भोजनाचे आयोजन केले.

The Guardian Minister Bacchu kadu washed Viramata's feet | पालकमंत्र्यांनी धुतले विरमातांचे पाय, प्रेमाने भरवला घास

पालकमंत्र्यांनी धुतले विरमातांचे पाय, प्रेमाने भरवला घास

Next
ठळक मुद्देशहीदांच्या कुटुंबियांना स्नेहभोजन प्रशासकीय अधिकारी झाले वाढपी

अकोला : ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे म्हणतात, पण आज ह्या पूर्णब्रह्मालाही कृतज्ञता वाटावी,अशी प्रचिती देणारे औचित्य पालकमंत्री बच्चू कडू यांनी साधले. निमित्त होते शहिद कुटुंबियांसमवेत स्नेह भोजनाचे! शहिदांचे वारस, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, पुत्र, कन्या यांच्या ‘वदनी’ गेलेला हा पूर्णब्रह्माचा ‘कवळ’ स्वतःलाच धन्य मानत होता!

स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहिदांच्या कुटूंबियांसमवेत पालकमंत्र्यांनी स्नेह भोजनाचे आयोजन केले. त्यात स्वतः पालकमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या हातांनी जेवण वाढले. जिल्हाधिकारी, प्रशासनातले इतर अधिकारीही वाढपी झाले. थाटामाटात म्हणावा असा हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू शहिदांच्या कुटुंबियांच्या विषयावर प्राधान्याने काम करीत आहेत. त्यांना शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांबाबत ते अधिक जागरुक आहेत. पालकमंत्र्यांच्या या संवेदनशीलतेची प्रचिती रविवारच्या शहीद कुटुंबियांसमवेत स्नेहभोजन या कार्यक्रमातून आली. वीरमातांचे पाय स्वतः पालकमंत्र्यांनी धुतले. या स्नेहभोजनाचा थाट मोठा होता. प्रत्येक वीर माता, वीर पिता , वीर पुत्र, वीर कन्या, वीर पत्नी ह्यांना सन्मानाने बसविण्यात आले. स्वतः पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रशासनातले उच्च अधिकारी वाढपी झाले. पालकमंत्र्यांनी आपल्या मनोगतात सांगितले त्याप्रमाणे ‘ तुमच्या सोबत जेवणाची संधी मिळाली, हे आमचे भाग्य’, त्यामुळे सर्वांचे सर्व अभिनिवेश गळून पडले.

 

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह अनेक अधिकारीही उपस्थित होते.

Web Title: The Guardian Minister Bacchu kadu washed Viramata's feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.