पालकमंत्री दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:11 AM2017-10-30T01:11:42+5:302017-10-30T01:13:07+5:30

अकोला : जतनेच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री डॉ.  रणजित पाटील यांनी पुढाकार घेत दर सोमवारी जिल्हाधिकारी  कार्यालयात स्वत: उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.  

Guardian Minister Every Monday at the Collector's office | पालकमंत्री दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात

पालकमंत्री दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात

Next
ठळक मुद्देसुरुवात ३0 ऑक्टोबरपासूनसकाळी ११ ते  दुपारी १ वाजेपर्यंत नागरिकांच्या विविध समस्या निवारण्याचा प्रयत्न


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जतनेच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री डॉ.  रणजित पाटील यांनी पुढाकार घेत दर सोमवारी जिल्हाधिकारी  कार्यालयात स्वत: उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.  त्याची सुरुवात ३0 ऑक्टोबरपासून होत असून, सकाळी ११ ते  दुपारी १ वाजेपर्यंत नागरिकांच्या विविध तक्रारी व समस्या ऐकून  घेत त्या निवारण्याचा तत्काळ प्रयत्न केला जाणार आहे. 
सोमवार हा अधिकार्‍यांचा मुख्यालय दिवस असतो. त्या दिवशी  दौर्‍यावर जाण्याऐवजी सर्वच अधिकारी कार्यालयात उपस्थित  असतात, त्यामुळे सोमवारी पालकमंत्री जिल्हाधिकारी  कार्यालयात स्वत: नागरिकांचे प्रश्न ऐकणार असतील, तर त्या  प्रश्नांमधील जास्तीत जास्त प्रश्न त्याच दिवशी मार्गी लागू शकता त. जनतेने आपल्या  समस्या, प्रश्न लेखी स्वरूपात घेऊन हजर  राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Guardian Minister Every Monday at the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.