पालकमंत्र्यांनी केली जीएमसी आणि कोविड केअर सेंटरची केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 06:10 PM2020-06-10T18:10:59+5:302020-06-10T18:12:19+5:30
पालकमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयाला अचानक भेट दिली.
अकोला : पालकमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी थेट सर्वोपचार रूग्णालयातील मेसची पाहणी करून रूग्णांना दिल्या जाणाºया जेवणाचा दर्जा वाढविण्याचे निर्देश दिले. यानंतर त्यांनी थेट पीकेव्ही गाठत कोविड केअर सेंटरची पाहणी करत स्वच्छतेचा आढावा घेतला.
पालकमंत्री कडू यांनी बुधवारी सकाळी सर्वोपचार रुग्णालयातील ‘मेस’ला अचानक भेट देऊन रूग्णांना दिल्या जाणाºया खाद्यपदार्थाचा दर्जा तपासला. यावेळी त्यांनी रूग्णालय प्रशासनाला जेवणाचा दर्जा वाढविण्याचे निर्देश देत रूग्णांना जेवणामध्ये पातळ भाजी देखील देण्याबाबत सुचना केली. सर्वोपचार रुग्णालयात जास्त वेळ न घालवता पालकमंत्री कडू यांनी थेट पीकेव्हीतील कोविड केअर सेंटर गाठले. पालकमंत्र्यांच्या अचानक भेटीमुळे येथील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावेळी यांनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाºयांकडून रूग्णांना दिल्या जाणाºया सोई सुविधांविषयी माहिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी थेट रूग्णांशी चर्चा करून अधिकारी, कर्मचाºयांनी सांगितलेल्या माहितीची शहानिशा केली. सांगितलेली माहिती विसंगत असल्याने उपस्थित अधिकाºयांना प्रश्नांची उत्तरे देणे कठीन झाले होते. रुग्णांची होणारी गैरसोय अन् प्रशासनाचा कारभार, यावरून पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. या प्रसंगी आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी पापळकर, सिव्हिल सर्जन डॉ. चव्हाण, प्रांत डॉ. निलेश अपार, डॉ. फारुख शेख, तसेच इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.