पालकमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांसोबत संवाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:29 PM2018-11-12T13:29:12+5:302018-11-12T13:32:19+5:30

अकोला: निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस कठीण होत चाललेल्या शेतीत टिकून राहायचे असेल, तर शेतकºयांनी गटशेतीच्या माध्यमातून शेतीपूरक उद्योगांची कास धरावी आणि आपला आर्थिक विकास साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.

Guardian Minister interacted with farmers! | पालकमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांसोबत संवाद!

पालकमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांसोबत संवाद!

Next


अकोला: निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस कठीण होत चाललेल्या शेतीत टिकून राहायचे असेल, तर शेतकºयांनी गटशेतीच्या माध्यमातून शेतीपूरक उद्योगांची कास धरावी आणि आपला आर्थिक विकास साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.
कापशी येथे शनिवार, १0 नोव्हेंबर रोजी त्यांनी शेतकºयांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी कापशी येथील स्वयंभू गणेश शेतकरी बचत गटाच्या विविध लघू उद्योगांना भेटी दिल्या आणि उद्योगांची माहिती जाणून घेतली. यामध्ये यंत्राद्वारे तयार करण्यात येणाºया गरम मसाला उद्योग, मिनी दालमिल, पेढा उद्योग, लिंबू व लोणचे उद्योगासोबतच इतर लघू उद्योगांची पाहणी केली आणि शेतीला जोड देऊन लघू उद्योग उभा करून प्रगती साधणाºया शेतकºयांचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी कौतुक केले आणि कापशी परिसरातील शेतकºयांकडून इतर शेतकºयांनी प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले. पालकमंत्री डॉ. पाटील यांनी कापशी तलाव येथील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहणी केली. स्वयंभू गणेश गटाने कमीत कमी पाण्याचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या पपई बागेला भेट दिली. यावेळी गटाचे अध्यक्ष पुरु षोत्तम चतरकर, डॉ. संजय धोत्रे, प्रकाश चतरकर, शरद झामरे, गोपाल राऊत, वसंतराव चतरकर, बळवंत आमले, बाळू फेंड, कन्हैया यादव, पुरु षोत्तम उमाळे, पिंटू कोकाटे, गजानन डिवरे, संतोष चतरकर, शांताराम रोकडे, प्रल्हाद गुडधे, परशराम दांदळे, विश्वनाथ खंडारे, राम चतरकर, अंबादास जाधव, संजय राऊत, नरेंद्र पांडव, गजानन चतरकर, प्रदीप चतरकर, श्रीराम पांडव, प्रशांत टाले, नीतेश बराटे, गजानन लाहुडकार, बळीराम टाले, अमोल काळे, गोपाल चतरकर, संतोष नेरकर, मंगेश पाटेखेडे, नितीन गुडधे, संतोष ताले, विद्याधर बराटे, दत्ता ढोरे, गजानन इंगळे, सुनील पाटील, राजेंद्र टाले, अमोल डोंगरे, राजेश खंडारे, विजय टाले, सदानंद ढोंबळे, देवीदास उगले, नारायण लेंभाडे, विठ्ठल चतरकर, प्रवीण चतरकर, संतोष चतरकर आदी शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: Guardian Minister interacted with farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.