पालकमंत्र्यांनी घेतला कृषी, अन्न प्रक्रिया प्रदर्शनाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:44 PM2017-11-27T23:44:34+5:302017-11-27T23:53:24+5:30

अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनच्यावतीने ५ ते ७ जानेवारी २0१८  या कालावधीत अकोल्यात आयोजित करण्यात आलेल्या कृषी व अन्न प्रक्रिया  प्रदर्शनाचा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी आढावा घेतला.

Guardian Minister reviewed agriculture, food processing exhibition | पालकमंत्र्यांनी घेतला कृषी, अन्न प्रक्रिया प्रदर्शनाचा आढावा

पालकमंत्र्यांनी घेतला कृषी, अन्न प्रक्रिया प्रदर्शनाचा आढावा

Next
ठळक मुद्देयशस्वी आयोजनासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करणारकृषी विद्यापीठ, आत्मा, आयटीआय, पशुसंवर्धन, कौशल्य-विकास व  अभियांत्रिकी महाविद्यालयांना सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनच्यावतीने ५ ते ७ जानेवारी २0१८  या कालावधीत अकोल्यात आयोजित करण्यात आलेल्या कृषी व अन्न प्रक्रिया  प्रदर्शनाचा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी आढावा घेतला.
अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या आढावा बैठकीला प्रभारी  जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी एस. रामामूर्ती,  अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनचे कैलाश  खंडेलवाल, श्रीकांत पडगीलवार यांच्यासह कृषी व आत्माचे अधिकारी उपस् िथत होते. 
प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहणार  असल्याची ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी  विद्यापीठ, आत्मा, आयटीआय, पशुसंवर्धन, कौशल्य आणि विकास विभाग व  अभियांत्रिकी महाविद्यालयांनीसुद्धा प्रदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाह  त्यांनी यावेळी केले. या उपक्रमात सहभागी होणार्‍या संबंधित विभागांना  प्रदर्शनस्थळी स्टॉल लावता येतील. शेतकरी व शाळा-महाविद्यालयीन विद्या र्थ्यांकरीता हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार असल्याने सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा,  असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. 

Web Title: Guardian Minister reviewed agriculture, food processing exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.