लाेकमत रक्ताचे नाते बाेधचिन्हाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:25 AM2021-06-16T04:25:56+5:302021-06-16T04:25:56+5:30
लाेकमत कार्यालयात साेमवारी संध्याकाळी आयाेजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, प्रख्यात उद्याेजक श्रीराम मित्तल, सामाजिक कार्यकर्ते पंकज जायले प्रामुख्याने ...
लाेकमत कार्यालयात साेमवारी संध्याकाळी आयाेजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, प्रख्यात उद्याेजक श्रीराम मित्तल, सामाजिक कार्यकर्ते पंकज जायले प्रामुख्याने उपस्थित हाेते. प्रारंभी श्रद्धेय बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले की, रक्ताला जात, धर्म, पंथ नसताे. रक्तदानाने माणुसकीचे नाते तयार हाेते. रक्तदानातून मानवता वृद्धिंगत हाेते. अनेकांचे प्राण वाचतात, त्यामुळे आजच्या काेराेना संकटात रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन केले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करून रक्तदान हे सर्वात माेठे दान आहे, असे स्पष्ट करत जास्तीतजास्त लाेकांनी रक्तदान करावे, असे आवाहन केले. पंकज जायले व श्रीराम मित्तल यांनीही या माेहिमेला शुभेच्छा दिल्या. लाेकमत अकाेला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी प्रास्ताविकातून लाेकमत रक्ताचे नाते या माेहिमेमागील भूमिका विशद केली. लाेकमतने सदैव लाेकांच्याच हिताची भूमिका घेतली असून काेराेनाच्या या संकटात रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये, रक्तदान महायज्ञ आरंभला असल्याचे सांगितले. लाेकमत अकाेला आवृत्तीचे युनिट हेड आलाेककुमार शर्मा, लाेकमत समाचारचे प्रभारी अरुणकुमार सिन्हा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संचालन व आभारप्रदर्शन लाेकमतचे उपवृत्तसंपादक राजेश शेगाेकार यांनी केले.
काेट...
रक्तदान हे मानवतेचे कार्य आहे. मी स्वत: शंभरवेळा रक्तदान केले आहे. लाेकमतने रक्तदान माेहिमेंतर्गत रक्ताचे नाते वृद्धिंगत करणारी माेहीम हाती घेतली आहे. या माेहिमेत रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा.
- बच्चू कडू, पालकमंत्री, अकाेला