वाजंत्री व्यवसाय संकटात आल्याने टोपले, सुप, विक्री करणारांची पालकमंत्र्यांनी  घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 08:11 PM2021-06-14T20:11:31+5:302021-06-14T20:11:38+5:30

Murtijapur News : 'लॉकडाऊनमुळे वाजंत्री व्यवसाय संकटात; टोपले, सुप फळे विकण्याची आली वेळ' या मथळ्याखाली 'लोकमत'ने १३ जून रोजी वृत्त प्रकाशित केले होते.

The Guardian Minister visited the sellers of baskets, soups, as the music business was in crisis | वाजंत्री व्यवसाय संकटात आल्याने टोपले, सुप, विक्री करणारांची पालकमंत्र्यांनी  घेतली भेट

वाजंत्री व्यवसाय संकटात आल्याने टोपले, सुप, विक्री करणारांची पालकमंत्र्यांनी  घेतली भेट

Next

मूर्तिजापूर : लॉकडाऊन काळात लग्न समारंभात वाजंत्री व्यवसाय करणाऱ्या बॅंड पथकावर आर्थिक संकट ओढवले आहे, 'लॉकडाऊनमुळे वाजंत्री व्यवसाय संकटात; टोपले, सुप फळे विकण्याची आली वेळ' या मथळ्याखाली 'लोकमत'ने १३ जून रोजी वृत्त प्रकाशित केले होते, या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री बच्चु कडु यांनी दखल घेत टोपले, सुप, फळे विकणाऱ्या व्यवसायीकांची भेट घेऊन अडीअडचणी जाणून घेतल्या.
          लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायावर गंडांतर आले त्यातून लग्न समारंभात वाजंत्री व्यवसाय करणारे कलांवतही सुटले नाहीत, या कलावंतांना आता टोपले, सुप, फळे विकून व किरकोळ मजूरी करुन आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गत वर्षापासून अनेक लहान मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत. कोरोना काळात लग्न मंडपी वऱ्हाडी मंडळी लग्नसोहळ्यात एकत्र येण्यास बंधने असल्याने व मोजक्याच लोकांच्या उपस्थित विवाह पार पडण्याची परवानगी असल्याने लग्न समारंभातून 'बँडबाजा' बाद झाला आहे. यामुळे या व्यवसायीकांवर उपासमारीची पाळी आली आहे. या संदर्भात लोकमत'ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची पालकमंत्री बच्चु कडु यांनी आवर्जून दखल घेत टोपले विक्री करण्यात येत असलेल्या दुकानदार जाऊन दिनेश गायकवाड यांची भेट घेऊन अडीअडचणी जाणून घेऊन सहानुभूती व्यक्त केली. 
 
पालकमंत्र्यांनी खरेदी केली 'दवडी'

वाजंत्री व्यवसाय ठप्प झाल्याने वाजंत्री व्यवसायीकानी टोपले, सुप, फळे, विकण्याचा पारंपरिक व्यवसाय सुरू केला. सोमवारी पालकमंत्री बच्चु कडु यांनी या व्यवसाय करणाऱ्यांना भेट दिली. दरम्यान सहानुभूती म्हणून बच्चू कडू यांनी या दुकानातून एक 'दवडी' खरेदी केली

Web Title: The Guardian Minister visited the sellers of baskets, soups, as the music business was in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.