पनोरी नाल्याचे खोलीकरण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:20 AM2021-07-30T04:20:14+5:302021-07-30T04:20:14+5:30
मुरलीधर आनंदा बुटे यांचे नुकतेच गावच्या नाल्याच्या पुरात बुडून निधन झाले. पालकमंत्री कडू यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. ...
मुरलीधर आनंदा बुटे यांचे नुकतेच गावच्या नाल्याच्या पुरात बुडून निधन झाले. पालकमंत्री कडू यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन केले. बुटे यांचा मुलगा महेश व मुलगी वैष्णवी यांना प्रत्येकी दोन लाख रुपये असे एकूण चार लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचा धनादेश पालकमंत्र्यांनी सुपुर्द केला. या कुटुंबाला अन्य योजनांमधून मदत मिळवून देऊ, तसेच ज्यांच्या घराचे पूर्णतः नुकसान झाले त्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळवून देऊ. शिवाय मुलगा महेश याला शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन दिले. तसेच पनोरी गावच्या नाल्याचे खोलीकरण, तसेच गावच्या रस्त्याचे काम लवकरात लवकर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येईल, असेही कडू यांनी सांगितले.
या वेळी पंचायत समिती सभापती लताबाई नितोने, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, तहसीलदार नीलेश मडके, गटविकास अधिकारी किशोर शिंदे तसेच अन्य अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो: