पिंजर येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:20 AM2021-05-27T04:20:22+5:302021-05-27T04:20:22+5:30

पिंजर : खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. कृषी विभागामार्फत पिंजर येथे ...

Guidance to farmers at Pinjar | पिंजर येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

पिंजर येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Next

पिंजर : खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. कृषी विभागामार्फत पिंजर येथे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व मार्गदर्शन करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल कृषी अधिकाऱ्यांच्या पथकातर्फे खरीप हंगामपूर्व मार्गदर्शन मोहीम राबवली जात आहे. यावेळी घरचे सोयाबीन तपासणी करणे, बीज प्रक्रिया करणे, निंबोळी जमा करून फवारणीकरिता अर्क तयार करणे, सुपिकता निर्देशांकानुसार खताचा वापर करणे, शिफारशी खताच्या मात्रेमध्ये दहा टक्के खताच्या मात्रेत कपात करणे, याकरिता सेंद्रिय खताचा वापर करणे, पाण्यात विद्राव्य खतांचा वापर करणे, रुंद-सरी-वरंबा पद्धतीने सोयाबीन पिकाची लागवड करणे, ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने पेरणी करताना घ्यावयाची काळजी, खत वाटप तसेच महाडीबीटी प्रणालीवर प्रमाणित बियाणे वितरण व प्रात्यक्षिक शेतकऱ्यांनी अर्ज करण्याबाबत माहिती देण्यात आली. मंडल कृषी अधिकारी राऊत, कृषी पर्यवेक्षक बोबडे, कृषी सहाय्यक वावकर, कापसे, पाटील, शिंदे व जगताप यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Guidance to farmers at Pinjar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.