तिवसा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:17 AM2021-02-07T04:17:57+5:302021-02-07T04:17:57+5:30
या वेळी कृषी विज्ञान केंद्र सिसा (उदेगाव)चे डाॅ. चारुदत्त ठिपसे यांनी हरभरा, गहू, भुईमुग या पिकावरील कीड व रोगाबाबत ...
या वेळी कृषी विज्ञान केंद्र सिसा (उदेगाव)चे डाॅ. चारुदत्त ठिपसे यांनी हरभरा, गहू, भुईमुग या पिकावरील कीड व रोगाबाबत तसेच पीक संरक्षणासाठी करावयाच्या उपाययोजनेची सविस्तर माहिती दिली. मंडळ कृषी अधिकारी महान अविनाश मेश्राम यांनी बीज प्रक्रियेचे महत्त्व, फेरोमन ट्रॅप, पक्षी थांबे बाबत तसेच कृषी साहाय्यक आर. के. धरभर यांनी पुढील खरीप हंगामासाठी सोयाबिन बियाणे व्यवस्थित ठेवणे व घरच्या घरी बियाण्याची उगवण क्षमता तपासणे, कापूस फरदळ निर्मूलन करणे, पुढील वर्षी बोंडअळी येऊ नये याकरिता उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. त्याचबरोबर समूह साहाय्यक विनोद चव्हाण यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत योजनांची माहिती दिली. त्यानंतर अर्जुन इंगोले यांच्या शेतातील हरभरा पिकाची पाहणी करून कीड व्यवस्थापणासाठी माहिती देण्यात आली. याप्रसंगी सरपंच गजानन लुले, पोलीस पाटील संदीप मनवर, पांडुरंग पाटील, शंकर लुले, प्रशांत पाटील, उदेभान लुले, अजय लुले आदी उपस्थित होते.